VIDEO :'येऊ कशी तशी मी नांदायला' चा शेवटचा भाग असा झाला शुट ; कलाकार झाले भावुक
VIDEO :'येऊ कशी तशी मी नांदायला' चा शेवटचा भाग असा झाला शुट ; कलाकार झाले भावुक
झी मराठीवरली 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच शेवटचा भाग नुकताच चित्रीत झाला.
मुंबई, 23 फेब्रुवारी- झी मराठीवरली 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla ) मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच शेवटचा भाग नुकताच चित्रीत झाला. याचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. मालिकेचा शेवटचा( yeu kashi tashi me nandayla last episode) भाग कसा असणार याची झलक पाहायला मिळत आहे.
झी 5 मराठीनं नुकताच 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. मालिका लवकरच निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट कसा असणार याची सर्वांना उत्सुकता आहे. याचा उलगडा या व्हिडिओतून होताना दिसत आहे. शेवटच्या भागात नलू मावशीपासून ते सगळ्यांच्या लुकमध्ये काहीसा बदल झालेला दिसत आहे. त्यामुळे मालिकेत शेवटी नेमकं काय दाखवणार याची अतुरता सर्वांना लागली आहे.
शेवटच्या दिवशी सर्व कलाकरा भावुक झाल्याचे दिसले. प्रत्येकाला मालिकेचा सुरूवातीचा दिवस असेल किंवा सेटवरील धमाल मस्ती आठवत होती. प्रत्येकजण भावुक झालं होतं. पण असं जर असलं तरी ही मालिका संपली असली तरी ती आता झी 5 मराठीच्या अॅपवर पाहता येत असल्याचे देखील स्वीटूने यावेळी सांगितले. शेवटच्या भागातील सर्वांचा लुक पाहाता मालिकेत शेवटच्या भागात मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सततच्या ट्वीस्टमुळे चर्चेत असते. मात्र मागच्या काही दिवसापासून मालिकेचा टीआरपी घसरत आहे. याचा विचार करूनच मालिका बंद करण्यात येत असल्याची चर्चा आहे. मालिका बंद झाल्यानंतर प्रेक्षक मात्र ओम आणि स्वीटूच्या जोडीला प्रेक्षक मिस करणार एवढं मात्र नक्की आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.