Home /News /entertainment /

हा काही शेवट नाही...येऊ कशी तशी मी नांदायला टीमचा शेवटच्या दिवशी भावुक करणारा शेवटचा मेसेज

हा काही शेवट नाही...येऊ कशी तशी मी नांदायला टीमचा शेवटच्या दिवशी भावुक करणारा शेवटचा मेसेज

yeu kashi tashi me nandayla last epidode :आज मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यावेळी मालिकेच्या टीमने मालिकेच्या काही गोड आठवणी फोटो रूपात शेअर करत एक भावुक करणार मेसेज लिहिला आहे.

  मुंबई, 19 मार्च - झी मराठीवरील येऊ कशी तशी  मी नांदायला मालिका(  yeu kashi tashi me nandayla last epidode ) कमी काळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण यशस्वी झाली. मात्र मधल्या काळात मालिकेत जे ट्वीस्ट आले त्यामुळे मालिकेला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. शेवटी मालिका निरोप घेणार असल्याचे समोर आलं. आज मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यावेळी मालिकेच्या टीमने मालिकेच्या काही गोड आठवणी फोटो रूपात शेअर करत एक भावुक करणार मेसेज लिहिला आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या अधिकृत इन्स्टा पेजवर आज मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर मालिकेतील काही गोड फोटो शेअर केले आहेत. शिवाय एक मेसेज देखील पोस्ट केला आहे. मालिकेच्या टीमनं या मेसेज मध्ये म्हटलं आहे की, रसिक मायबाप...३७८ भागाचं आपलं नातं अगदी अतूट विणल गेलंय, गेले १ वर्ष ३ महिने आपण एकमेकांसोबत होतो. हसलो, खिदळलो, रडलो, शिकलो आणि एकमेकांत जास्तीत जास्त रमत गेलो. वाचा-Video : या अभिनेत्रीनं पहिल्यांदाच केल्या पुरणपोळ्या !कशा झाल्या ते पाहा.. एकत्र कुटुंबाला जोडणाऱ्या नलू आणि सुमन काकी, आपल्या माणसांसाठी त्रास सहन करणारे दादा व काका, अल्लड, मस्तीखोर पण कुटुंबावर प्रेम करणारा चीन्या, श्रीमंतीत राहूनही आपले संस्कार न विसरलेली शकू, स्वार्थी पण स्वाभिमानी व निडर असणारी मालविका, सर्वांचा जिवाभावाचा मित्र म्हणजे रॉकी, नारळाप्रमाणे बाहेरून कडक पण आतून सौम्य असणारे डॅडी, ह्या दोन्ही कुटुंबाला जोडणारा दुवा म्हणजे आपले लाडके " स्वीकार". ह्या सर्व पात्रांनीच गेले काही वर्षभर आपले मनोरंजन केले, आपल्याला भरभरून प्रेम दिल. आज आपल्या लाडक्या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. आता इतकंच सांगतो आहोत की हा काही शेवट नाही तर आपल्या नात्यात गोडवा वाढवणारा एक गोड दुरावा आहे. निरोप घेत आहोत...पुन्हा नव्याने भेटूच...
  या पोस्टनंत मालिकेचे चाहते देखील भावुक झाले आहेत. अनेकांनी कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे की, मालिका जरी संपली असली तरी या मालिकेने अनेक गोड आठवणी दिल्या आहेत. तर काहींनी या मालिकेतील सर्वांचं आवडतं कपल ओम आणि स्वीटूला मिस करणार असल्याचे देखील म्हटलं आहे. मालिका संपणा असल्याचे मागच्या काही दिवसापूर्वीच जाहीर झालं होतं. यापूर्वी मालिकेचा शेवटचा भाग चित्रीत झाला होता तेवहा देखील मालिकेतील कलाकार भावुक झाल होते. मालिकेतील कलाकारांनी देखील याबद्दल सोशल मीडियाच्य माध्यमातून भावना व्यक्त केल्या होत्या.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या