• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • बंडखोरांनी केलं अभिनेत्रीचं अपहरण; डोळ्यांवर पट्टी बांधून केला बलात्कार

बंडखोरांनी केलं अभिनेत्रीचं अपहरण; डोळ्यांवर पट्टी बांधून केला बलात्कार

हौथी या संघटनेनं तिचं आपहरण केलं आहे असा आरोप इंतिसारच्या वकिलांनी केला आहे. शिवाय तिच्यावर दररोज शारिरिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती देखील त्यांनी दिली आहे.

 • Share this:
  मुंबई 9 मे: येमेन या देशातील प्रसिद्ध अभिनेत्री इंतिसार अल हम्मादी (Entisar al Hammadi) हिचं अपहरण करण्यात आलं आहे. ती केवळ 20 वर्षांची असून तिच्यावर शारिरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. (kidnapped by Iran backed Houthis) मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एका निवेदनातून याबद्दलची माहिती प्रकाशीत केली आहे. येमेनची राजधानी सना येथून 20 फेब्रुवारी रोजी तिचं आपहरण करण्यात आलं. हौथी या संघटनेनं तिचं आपहरण केलं आहे असा आरोप इंतिसारच्या वकिलांनी केला आहे. शिवाय तिच्यावर दररोज शारिरिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती देखील त्यांनी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावरून जात असताना हौथीच्या सैनिकांनी इंतिसारला ताब्यात घेतलं. त्यांनी तिची गाडी थांबवली अन् खेचून तिला बाहेर काढलं. त्यानंतर तिच्यावर अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आरोप केले. शिवाय डोळ्यांवर पट्टी बांधून भर रस्त्यात तिच्यासोबत अश्लिल कृती केल्या. तिच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या करुन घेतल्या. अन् स्वत:सोबत घेऊन गेले. तिला अद्याप सोडलेलं नाही शिवाय तिची कौमार्य चाचणी देखील केली असून दररोज तिच्यावर शारिरीक आणि मानसिक अत्याचार होत असल्याचा आरोप इंतिसारच्या वकिलांनी केला आहे. PHOTO: असा दिसतो छोटा नवाब; पाहा करीनाच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक यमेन या देशातील बहुतांश भाग हौथी बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडे स्वत:चे सैनिक आहेत. त्यामुळं यमेनच्या सरकारचं देखील त्यांच्यावर नियंत्रण नाही. किंबहुना सरकारमधील अनेक मंडळी सौदी अरेबिया येथे राहतात असं म्हटलं जातं. हौथी बंडखोरांनी गेल्या काही काळात संपूर्ण देशात धुडगुस घातला आहे. अपारंपारिक कपडे घालणाऱ्या, पाश्चात्य विचारांचं अनुकरण करणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. शिवाय त्यांच्यावर शारिरिक अत्याचार केले जात आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री इंतिसार अल हम्मादी हिच्यासोबत घडला. इंतिसारच्या बातमीमुळं सोशल मीडियावर एकच कल्लोळ माजला आहे. नेटकरी या प्रकरणाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: