मुंबई, 16 मार्च- 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून अभिनेत्री शिवांगी जोशी घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत शिवांगीने नायरा ही भूमिका साकारली होती. मालिकेतून अभिनेत्रीला प्रचंड प्रेम मिळाला होता. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान शिवांगीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या वृत्तामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
शिवांगी जोशी ही मालिका विश्वातील एक ओळखीचा चेहरा बनली आहे. शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. शिवांगीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते नेहमीच तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र सध्या शिवानीबाबत एक नाराज करणारी बातमी समोर आली आहे. शिवांगी सध्या रुग्णालयात भरती आहे.
(हे वाचा: Daljiet Kaur Wedding: शालिन भनौतच्या एक्स-पत्नीची लगीनघाई; प्री-वेडिंग कार्यक्रमांना झाली सुरुवात)
शिवांगी जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री सतत आपल्या दैनंदिन पोस्ट शेअर करत आपल्या अपडेट्स देत असते. नुकतंच अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपण रुग्णालयात भरती असल्याचं सांगितलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शिवांगीला किडनी इन्फेक्शन झालं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. अभिनेत्रीने आपला रुग्णालयातील बेडवर झोपलेला फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
शिवांगी जोशी सध्या बऱ्यापैकी ठीक आहे. अभिनेत्रीने आपल्या आजारपणाची माहिती स्वतः दिली आहे. शिवांगीने पोस्ट शेअर करताच ती आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते आणि सेलिब्रेटी शिवांगीला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
शिवांगी जोशीला 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मालिकेतील नायरा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. दरम्यान हे दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं. मात्र दोघांनीही अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाहीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress