मुंबई, 5 ऑगस्ट : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नैतिक म्हणजेच अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. करण मेहरा पत्नी निशा रावलसोबतच्या वादांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्यानेही पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दोघांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळत आहे.
करण मेहराने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निशाबाबत धक्कादायक खुलासा केला. करणने सांगितले की त्याची पत्नी निशा हिचे राखी भाऊ रोहित साथियासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. निशा आधी रोहित साथियाला तिचा भाऊ मानत होती, त्याला राखी बांधली होती, पण आता निशा त्याच्यासोबत अवैध संबंध आहेत. करणने रडत रडत सांगितले होते की, निशा त्याला त्याच्या मुलाला भेटू देत नाही. एवढेच नाही तर निशा आणि रोहित त्यांच्याच घरात राहतात.
हेही वाचा - Ranveer Singh पुन्हा होणार न्यूड?; 'या' प्रसिद्ध संस्थेनं दिली मोठी ऑफर
निशा आणि रोहित त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून धमकीचे फोन येत आहेत, असंही करणनं सांगितलं. निशाची आई लक्ष्मी रावल यांनाही हे माहीत आहे. निशा रावल, रोहित सेठिया आणि लक्ष्मी रावल यांनी माझ्याविरुद्ध कट रचून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांनी खोटे आरोप केले, मला घराबाहेर काढले आणि मारहाणही केली.
हेही वाचा - Raqesh Bapat and Shamita Shetty : ब्रेकअप नंतरही राकेश आणि शमिता आले एकत्र; व्हिडीओ तुफान व्हायरल
दरम्यान, गेल्या वर्षी करण मेहरा आणि निशा रावल यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले होते जेव्हा दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. निशाने करणवर मारहाणीचे सर्व आरोप लावले होते. याशिवाय तिनं करणनं मारहाणं केल्याचं कॅमेऱ्यासमोर येऊन दाखवलंही होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Social media, Tv celebrities, TV serials