मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेता करण मेहराला अटक

Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेता करण मेहराला अटक

निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

मुंबई, 01 जून: छोट्या पडद्यावर 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) फेम टीव्ही अभिनेता करण मेहराला (Karan Mehara) अटक करण्यात आली आहे. आपल्या पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री करण मेहराला अटक केली आहे. या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल (Nisha Rawal) यांच्या नात्यात वाद निर्माण झाला होता. पण सोमवारी दोघांमध्ये वाद पुन्हा एकदा विकोपाला गेला. त्यामुळे करण आणि निशामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग डोक्यात धरून करणने निशाला मारहाण केल्याची माहिती समोर आली.

नव्या कार खरेदीवर बंपर डिस्काउंट,'या' 5 कार्सवर मिळतेय तब्बल 3 लाखांपर्यंतची सूट

निशा रावलने करणच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर करणला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलं. करणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

अभिनेता शिवम पाटलाचा अभिनेत्रीवर गंभीर आरोप

दरम्यान, छोट्या पडद्यावर वाद विवाद सुरूच असतात.  छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोंमधून नावारुपास आलेला मराठमोळा अभिनेता शिवम पाटील (Shivam Patil) सध्या बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, अभिनेत्री मेधा शंकरनं (Medha Shankar) केलेल्या आरोपांमुळं त्याला काम मिळेनासं झालं. गेल्या काही काळापासून तो नैराश्येत आहे. पण अखेर त्यानं स्वत:ची संपूर्ण घुसमट सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं मेधाच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कसा ओळखाल चांगला आंबा? जाणून घ्या काही सोप्या ट्रिक्स

शिवमनं इन्स्टाग्रामद्वारे स्वत:च्या मानसिक स्थितीबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. ती सतत माझा अपमान करायची. माझ्या शरीरयष्टीवर विनोद करायची. तिनं अनेकदा माझं मानसिक आणि शारिरीक शोषण केलं आहे. माझ्या वस्तु ती तोडायची. ज्या गोष्टींसोबत माझं भावनिक नातं होतं अशा गोष्टी तिनं माझ्या डोळ्यांसमोर नष्ट केल्या. या संपूर्ण प्रकारामुळं मी त्रस्त होतो. पण तिच्याबाबत मी कोणाकडे तक्रारही करु शकत नव्हतो. कारण मला माझं करिअर संपण्याची भीती वाटत होती. किंबहुना ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती.”

तसंच शिवमनं या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे कायदेशीररित्या तक्रार देखील दाखल केली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणी कारवाई करतील अशी अपेक्षा त्याला आहे.

First published:
top videos