अभिनेते सचिन त्यागी कोरोना पॉझिटिव्ह; आता 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या शूटिंगलाही ब्रेक

अभिनेते सचिन त्यागी कोरोना पॉझिटिव्ह; आता 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या शूटिंगलाही ब्रेक

ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh rishta kya kehlata hai ) मधील सचिन त्यागी (sachin tyagi ) यांच्यासह क्रू मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : कोरोना लॉकडाऊनमध्ये आता काही अटींसह फिल्म आणि मालिकांच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या शूटिंगदरम्यान अनेकांना कोरोनाव्हायरसची लागण होत असल्याने एका मागोमाग एक मालिकांना ब्रेक लागत आहे. आता ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh rishta kya kehlata hai ) मधील अभिनेते सचिन त्यागी (sachin tyagi ) यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मालिकेचं शूटिंग आता थांबवण्यात आलं आहे.

सचिन त्यागी यांच्यासह क्रू मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. शिवांगी जोशी आणि मोहसिन खान स्टारर या मालिकेचं शूटिंह सोमवारी सकाळी दहा वाजता फिल्मसिटीमध्ये होत होतं. त्यावेळी सचिन त्यागी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं, स्पॉटबॉय वेबसाइटने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा - कोरोनाला हरवून बिग बी पुन्हा 'KBC 12' च्या सेटवर, शेअर केला PHOTO

सचिन हे मालिकेतील कार्तिकचे वडील मनीष गोयंकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह काही क्रू मेंबर्सचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हल आला आहे. सचिन यांना ताप होता त्यामुळे त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. याशिवाय इतर क्रू मेंबर्समध्येही लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनीही आपली टेस्ट केली. त्यापैकी काही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर काही जणांचा नेगेटिव्ह आहे. इतर मेंबर्सचीही टेस्ट करण्यात आली आहे, त्यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे.

हे वाचा - आधी रोजगार आता डोक्यावर छत; सोनू सूद हजारो प्रवासी मजुरांना देणार हक्काचं घर

याआधी कसौटी जिंदगी की आणि भाकरवडी मालिकेचं शूटिंगही कोरोनामुळे थांबलं होतं. कसौटी जिंदगी कीमधील मुख्य अभिनेता पार्थ समथानला मालिकेचं शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसातच कोरोना झाला होता. तर भाकरवडी मालिकेचा क्रू मेंबरचा गेल्या महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Published by: Priya Lad
First published: August 24, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या