• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मुलगा होणार की मुलगी? या अभिनेत्रीने डिलिव्हरीपूर्वीच केला खुलासा

मुलगा होणार की मुलगी? या अभिनेत्रीने डिलिव्हरीपूर्वीच केला खुलासा

एव्हलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर करत चाहत्यांनी ही बातमी दिली होती. यासोबत प्रेगनेंसीची बातमी देखील तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.आता तिनं आनंदाच्या भरात मुलगा होणार की मुलगी याचा देखील खुलासा केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर- ये जवानी है दिवानी’ (Yeh Jawaani Hai Deewani) चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) लवकरच आई होणार आहे. एव्हलिनने बॉयफ्रेंड तुशान भिंडीशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियात राहत असून एक डॉक्टर आहे. 15 मे रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे लग्न केले होते. एव्हलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर करत चाहत्यांनी ही बातमी दिली होती. यासोबत प्रेगनेंसीची बातमी देखील तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.आता तिनं आनंदाच्या भरात मुलगा होणार की मुलगी याचा देखील खुलासा केला आहे. भारतात गर्भलिंग निदानाला बंदी आहे.  यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एव्हलिन शर्माने अलीकडेच बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगितले की, 'आम्ही खूप उत्साही आहोत आणि आमच्या लहान मुलाला आमच्या हातात घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. ही मुलगी आहे आणि आम्ही खूप उत्साहित आहोत. आम्ही आमच्या लहान राजकुमारीसाठी एक आरामदायक नर्सरी सेटअप केला आहे. पण मला माहीत आहे की, पहिले काही महिने ती आमच्यासोबत आमच्या बेडवर झोपणार आहे. कुटुंब आणि मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. वाचा : OTT वर मनोरंजनाची मेजवानी! 'स्पेशल ओप्स 1.5' ते 'रेड नोटिस' या आठवड्यात रिलीज... एव्हलिन शर्माने जुलैमध्येच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्विमसूटमधील तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये तिचा आनंद व्यक्त केला होता. अभिनेत्रीने एक झोपलेला फोटो शेअर केला आहे ज्यात ती पोटावर हात ठेवताना दिसत होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं होतं, “तुला माझ्या कुशीत घेण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही.” वाचा: यळकोट यळकोट जय मल्हार! अन् सुयुशने आयुषीला घेतलं उचलून, पाहा फोटो 15 मेला एव्हलिनने गुपचुप लग्न उरकलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची बातमी दिली होती. लग्नाविषयी बोलताना एव्हलिन म्हणाली होकी की, ‘तुमच्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे या पेक्षा कोणतीही चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
  Published by:News18 Trending Desk
  First published: