मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Year Ender 2020 : लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या बेस्ट सीरिज, चित्रपट; तुम्ही पाहिले का?

Year Ender 2020 : लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या बेस्ट सीरिज, चित्रपट; तुम्ही पाहिले का?

लॉकडाउन काळात मनोरंजनासाठी लोकांनी आपला मोर्चा ओव्हर द टॉप अर्थात OTT कडे वळवला. घरीच राहून लोकांना अनेक मनोरंजनात्मक चित्रपट, वेबसीरिज पाहत्या आल्या.

लॉकडाउन काळात मनोरंजनासाठी लोकांनी आपला मोर्चा ओव्हर द टॉप अर्थात OTT कडे वळवला. घरीच राहून लोकांना अनेक मनोरंजनात्मक चित्रपट, वेबसीरिज पाहत्या आल्या.

लॉकडाउन काळात मनोरंजनासाठी लोकांनी आपला मोर्चा ओव्हर द टॉप अर्थात OTT कडे वळवला. घरीच राहून लोकांना अनेक मनोरंजनात्मक चित्रपट, वेबसीरिज पाहत्या आल्या.

  • Published by:  Karishma

मुंबई, 28 डिसेंबर : कोरोनामुळे 2020 मध्ये लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग लागू झालं. थिएटर, नाट्यगृहं बंद झाली. या दरम्यान मनोरंजनासाठी लोकांनी आपला मोर्चा ओव्हर द टॉप अर्थात OTT कडे वळवला. घरीच राहून लोकांना अनेक मनोरंजनात्मक चित्रपट, वेबसीरिज पाहत्या आल्या. या वर्षात रिलीज झालेल्या काही वेबसीरिज आणि चित्रपट प्रचंड गाजले. सरत्या वर्षातील गाजलेल्या मनोरंजनात्मक वेबसीरिज, मूव्हीजनी लोकांना खिळवून ठेवलं.

MONEY HEIST (La Casa De Papel) -

2020 मध्ये प्रेक्षकांना जबरदस्त खिळवून ठेवणारी वेबसीरिज म्हणजे नेटफ्लिक्सवरची स्पॅनिश MONEY HEIST. यातलं ‘बेला सिओ’ हे गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं. प्रत्येक सीजनमधील, प्रत्येक भागाबरोबर प्रेक्षकांच्या मनांत पुढे काय होणार अशी उत्सुकता निर्माण करणारं MONEY HEIST चं कथानक होतं. प्रेक्षकांची आतुरता शिगेला पोहोचायची. या सीजनचा शेवटही तितकाच रोमांचक होता.

पाताल लोक (PATAL LOK) -

प्रवाहाविरुद्ध पोहून गुन्हांचा शोध लावणाऱ्या पोलिस ऑफिसरची कथा म्हणजे पाताललोक. मराठीत आपण म्हणतो मग तो पाताळात लपून बसला तरी त्याला शोधून काढू. तसंच काहीसं कुठेही असला तरीही गुन्हेगाराला शोधून काढणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची जयदीप अहलावत यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. अभिनेत्री अनुष्का शर्माने या वेबसीरिजची निर्मिती केली होती. अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.

द क्राउन सिझन (THE CROWN) -

द क्राउनमध्ये, क्विनच्या भूमिकेत ऑलिव्हिया कोलमन, मार्गारेट थॅचर यांच्या भूमिकेत गिलिअन अँडरसन आणि प्रिन्सेस डायनच्या भूमिकेत एलिझाबेथ डिबिस्की यांनी इतका जीव ओतला होता की, त्या भूमिका लोकांच्या लक्षात राहिल्या. ब्रिटनमधील राजघराण्याशी संबंधित अनेक डॉक्युमेंट्री आणि कार्यक्रम या आधी प्रसिद्ध झाले आहेत पण ही सीरिज वेगळीच ठरली. नेटफ्लिक्सवरून प्रसिद्ध झालेली या रॉयल घराण्याची ही कथा अनेकांच्या पसंतीस उतरली.

टायगर किंग (TIGER KING) -

जॉन रेनेक, केल्सी, सॅफरी, जॉन फिन्ले यांच्या भूमिकांनी सजलेली टायगर किंग ही अमेरिकेतील सत्यकथेवर आधारित क्राइम डॉक्युमेंट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली. जोसेफ मालडोनाडो, कॅरोल बस्किन आणि डॉक या माजरांच्या मालकांच्या आयुष्यावर ही कथा आधारित आहे. नेटफ्लिक्सवर असलेल्या या सीरिजचे सात भाग असून वाघांचे मालक असलेल्या या तिघांच्या आयुष्यातील घटना आणि त्यातील थरार या मालिकेत पाहायला मिळतो.

बुलबुल (BULBBUL) -

1880 सालात ब्रिटिशांच्या काळातील बंगालमधील एका हवेलीशी जोडलेली ही हॉरर कथा आहे. एका बालवधूभोवती कथानक फिरतं आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवतं. मोठे सेट, तो काळ उभा करण्यात आलेलं यश यामुळे लोकांना हा शो आवडला. प्रमुख भूमिकेत असलेल्या तृप्ती दिमरीचं खूप कौतुक झालं. अविनाश तिवारी, पाओली दाम, राहुल बोस आणि परमब्रत चट्टोपाध्याय यांच्या भूमिकाही उल्लेखनीय ठरल्या.

स्पेशल ऑप्स (SPECIAL OPPS) -

डिस्नी हॉटस्टार स्पेशल्सवरची स्पेशल ऑप्स ही वेबसीरिज प्रचंड गाजली. भारतात होणाऱ्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमागे एकच सूत्रधार असल्याचा रॉचा अधिकारी हिम्मत सिंगचा (के. के. मेनन) अंदाज असतो. त्यानुसार तो आपली ऑपरेशन्स करतो असं याचं कथानक. करण टाकर, विनय पाठक, दिव्या दत्ता, महेर विज यांनीही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

काही महत्त्वाचे चित्रपट जे लॉकडाउनमध्ये चर्चेत राहिले.

तान्हाजी – द अनसंग वॉरियर (TANHAJI – THE UNSUNG WORRIER)

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा होती. वर्षाच्या सुरुवातीला 10 जानेवारीला रिलीज झालेला हा सिनेमा हिट ठरला. स्वराज्याच्या रक्षणासाठी पुण्याजवळचा कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंनी केलेल्या लढाईची कथा दिग्दर्शक ओम राऊतने मांडली होती. तानाजींची भूमिका अजय देवगण तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकरने साकारली होती.

गुलाबो सिताबो (GULABO SITABO) -

लखनौमधील एका जुनाट वाड्यात राहणाऱ्या घरमालक आणि भाडेकरूच्या वादाची ही रंजक आणि विनोदी कथा होती. ती अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली होती. म्हातारा घरमालक मिर्झाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती, तर भाडेकरूची भूमिका आयुष्मान खुरानाने साकारली. शुजित सरकारच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या चित्रपटातील जुगलबंदी लोकांना खूप आवडली.

गुंजन सक्सेना – द कारगील गर्ल (GUNJAN SAXSENA – THE KARGIL GIRL) -

भारतीय एअरफोर्स पायलट गुंजन सक्सेनाच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला लोकांची पसंती मिळाली. नेटफ्लिक्सवर असलेल्या या चित्रपटात गुंजनची भूमिका जान्हवी कपूरने केली होती. 1998 मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात गुंजनने मोलाची भूमिका बजावली होती.

दिल बेचारा (DIL BECHARA) -

2014 मधील रोमँटिक ड्रामा ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ याचा रिमेक हिंदीत दिल बेचारा म्हणून आला. यात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सुशांतसिंह राजपूतने जून महिन्यात आत्महत्या केल्यामुळे त्याचा हा शेवटचा चित्रपट ठरला. त्यामुळे डिस्नी हॉटस्टारने विना सबस्क्रिप्शन सर्वांसाठी हा चित्रपट उपलब्ध करून दिला होता. संजना संघवीनी या चित्रपटातून हिंदीसृष्टीत पदार्पण केलं.

अंग्रेजी मीडियम (ANGREZI MEDIUM) -

इरफान खानचा हा शेवटचा चित्रपट ठरला. राजस्थानी बिझनेसमनच्या भूमिकेत असलेल्या इरफानची मुलगी (राधिका मदान) लंडनमध्ये शिकायचा निर्णय घेते. त्यानंतर तिला तिथं पाठवण्यासाठी वडिल काय कष्ट घेतात याची कहाणी या चित्रपटात दाखवली आहे. 2017 मध्ये आलेल्या हिंदी मीडियमचा पुढचा भाग म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं गेलं. करिना कपूरनेही यात भूमिका साकारली. डिस्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

पंगा (PANGA) -

राष्ट्रीय कबड्डीपटू असलेल्या जया निगमच्या (कंगना राणावत) करिअरमध्ये आलेले उतार-चढाव या चित्रपटात दिसले. विशेषत: मुलगा मोठा झाल्यानंतर पुन्हा कबड्डीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेणारी जया आणि तिचा नवरा (जस्सी गिल) याची ही कथा आहे. ती लोकांना खूप आवडली. डिस्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट उपलब्ध आहे. कंगनाने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

First published:

Tags: Netflix, OTT