मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'ये है मोहब्बतें'फेम या अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न! Wedding फोटो झाला VIRAL

'ये है मोहब्बतें'फेम या अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न! Wedding फोटो झाला VIRAL

अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीत लग्नगाठ बांधली.

अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीत लग्नगाठ बांधली.

अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीत लग्नगाठ बांधली.

मुंबई, 20ऑक्टोबर- टीव्ही अभिनेता 'ये है मोहब्बतें' (Ye Hai Mohabbatein) फेम अभिषेक मलिकने(Abhishek Malik Wedding) त्याची गर्लफ्रेंड सुहानी चौधरीसोबत 18 ऑक्टोबर रोजी लग्न केलं आहे. हा विवाहसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने झाला. लग्नाच्या एक दिवसानंतर, अभिषेकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. 'ये है मोहब्बतें'मध्ये अभिषेक रोहनच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. अभिषेक आणि सुहानी 18 ऑक्टोबर रोजी एका खासगी समारंभात विवाहबद्ध झाले आहेत.

फारच सुंदर दिसत होतं जोडपं-

अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीत लग्नगाठ बांधली. फिकट रंगाच्या मॅचिंग आउटफिटमध्ये हे जोडपं खूप सुंदर दिसत होतं. अभिषेकने सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली होती,तसेच शेरवानीसह लाल रंगाच्या पगडीमध्ये तो खूप आकर्षक दिसत होता. तर दुसरीकडे, सुहानीने पेस्टल शेडमध्ये हेवी ब्रायडल लेहेंगा परिधान केला होता. सोबतच फुल स्लीव्ह्ज चोली परिधान केली होती. या लेहेंगा-चोलीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

अभिषेक त्याच्या लग्नातील एक फोटो शेअर करत लिहिले आहे, "मिस्टर अँड मिसेस मलिक." यासह, त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये काही लाल रंगासह हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. सुहानी चौधरीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हाच फोटो शेअर केला आहे. याआधी, या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्री वेडिंगचे फोटोही शेअर केले आहेत.

(हे वाचा:Bigg Boss 15 मध्ये असं काय झालं ज्यामुळे विशालने अफसानाच्या झिंज्या धरून फरफटलं)

असं झालं प्रेम-

अभिषेक आणि सुहानी एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते परंतु गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान दोघांनाही एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली आणि नंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन दरम्यान दोघेही त्यांच्या मूळ शहर दिल्लीला परतले होते. या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला त्यांनी सरप्राईज रोका सोहळाही केला होता.

सुहानी चौधरी खूपच सुंदर आहे आणि ती एक ब्लॉगर, फॅशन स्टायलिस्ट आणि फॅशन इन्फ्ल्यूएंसर आहे. ती एका बुटीकची मालकीन आहे. तर दुसरीकडे आपल्याला अभिषेक मलिकबद्दल आधीच माहिती आहे. त्याला ये है मोहब्बतें'मधून प्रसिद्धी मिळाली होती. अभिषेक मलिक शेवटचा 'पिंजरा खुबसूरती का' कलर्स वाहिनीच्या मालिकेमध्ये दिसला होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Tv actor