मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मी तेव्हा 35 वर्षांचा होतो...'; 'ऐ दिल है मुश्कील' मधील तो प्रसंग करण जोहरच्या आयुष्यावर आधारीत

'मी तेव्हा 35 वर्षांचा होतो...'; 'ऐ दिल है मुश्कील' मधील तो प्रसंग करण जोहरच्या आयुष्यावर आधारीत

Karan Johar

Karan Johar

करण जोहरच्या आयुष्यावर 'ऐ दिल है मुश्कील' चित्रपटातील तो सिन बनवण्यात आला होता.

मुंबई २७ मे: 2016 साली दिग्दर्शक , निर्माता करण जोहरचा  (Karan Johar) ‘ऐ दिल है मुश्कील’ (Ye Dil Hai Mushkil)  हा चित्रपट आला होता. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. करण ने स्वतःचं सगळं लक्ष या चित्रपटाकडे वळवलं होतं. या शिवाय अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bacchan) यांची विशेष उपस्थिती ही पाहायला मिळाली. पण याच चित्रपटातील काही सीन हे करणच्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर आधारीत होते.

करण ने काही वर्षांपूर्वी त्याचं पुस्तक ‘द अनसुटेबल बॉय’ (The Unsuitable Boy) हे पुस्तक प्रकाशित केलं होत. त्यात त्याने चित्रपटाविषयी आणि खऱ्या आयष्याविषयी सांगितलं आहे. याविषयी बोलताना करण ने म्हटलं होतं, “ ‘ऐ दिल है मुश्कील सोबत’ मी माझा वैयक्तीक अनुभव पहिल्यांदा कामाच्या स्वरुपात मांडला होता. मी याला आत्मचरित्र म्हणणार नाही कारण यात अनेक गोष्टी या काल्पनिक होत्या. पण काही संवाद आणि दृष्य अगदी खऱ्या जीवनाशी निगडीत आहेत. मी जवळपास चित्रपटातील रणबीर आहे. आणि चित्रपट हा संपूर्ण त्याच्या आणि त्याच्या तुटलेल्या हृयाविषयी आहे.”

करण स्वतःला रणबीर म्हणजेच चित्रपटातील आयान मध्ये पाहीलं होते. आयन आणि अलिझे म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा यांतील विशेष बॉंडींग पहायला  मिळालं होत. आयान आणि अलिझे मधील तो संवाद खऱ्या आयुष्यावर आधारीत होता. “रिश्ते जब जीस्मानी हे जाते है तो कहीन ना कही दोस्ती मीट जाती है. प्यार मे जुनून है पर दोस्ती मे सुकून है, और मै नही चाहती की हमारे बीच का सुकून कभी चला जाये.”

अलिझे आयानला समजावत असते की आपली मैत्री ही प्रेमात रुपांतरीत नाही होऊ शकत कारण मैत्रीत प्रेम आलं की मैत्री नष्ट होते. आणि तिला ती मैत्री कधीच गमवायची नाही. असाच अनुभव करणलाही त्याच्या आयुष्यात आला होता.

'इंटरनॅशनल क्रश' ठरतोय मराठमोळा नचिकेत लेले, नव्या VIDEOचं चाहत्यांकडून कौतुक

करण ने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे की, ‘मी ज्या व्यक्तिच्या प्रेमात होतो त्या व्यक्तिने मला सांगितले की, मी खूप आनंदीत आहे ती आपण शारिरीक सबंध प्रस्थापित केले नाहीत. पण त्या व्यक्तिने हेही सांगितलं की तु माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहेस, तु माढं आयुष्य आहेस, तु माझं सगळं काही आहे, पण तु माझा प्रियकर नाहीस. हे घडलं तेव्हा मी 35 वर्षांचा होतो. यातून बाहेर पडायला मला काही वर्षे लागली. मला समजलं की कधी कधी मन तुटनं हे देखिल चांगलं असतं.’

या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. शाहरुख खानचा विशेष कॅमिओ देखिल लक्षात ठेवण्याजोगा होता. त्याचा एक डायलॉग देखिल विशेष प्रसिद्ध झाला होता तो म्हणजे, “एक तरफा प्यार की ताकद ही कुच और होती है. और रिश्तो की तरह ये दो लोगो मे नही बंट ती.”

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Karan Johar