VIDEO : आई आणि फ्रेंडच्या वरातीत छोट्या परीचा झिंगाट डान्स, मोठ्यांना देतेय डान्समध्ये मात
VIDEO : आई आणि फ्रेंडच्या वरातीत छोट्या परीचा झिंगाट डान्स, मोठ्यांना देतेय डान्समध्ये मात
यश आणि नेहाच्या लग्नाचे शुटींग पूर्ण झाले आहे. त्यांच्या लग्नाच्या वरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये छोट्या परीचा (Myra Vaikul Latest Video ) झिंगाट डान्स सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
मुंबई, 6 जून- माझी तुझी रेशीमगाठ मालिका सध्या एका वेगळ्या ट्रॅकवर आहे. नेहाच्या आणि य़शच्या ( yash neha wedding ) लग्नाला आजोबांनी परवानगी दिली आहे. मालिकेत सध्या नेहाला पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे तोवर नेहा आणि यशच्या लग्नाची वरात देखील निघाली आहे. यश आणि नेहाच्या लग्नाचे शुटींग पूर्ण झाले आहे. त्यांच्या लग्नाच्या वरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये छोट्या परीचा (Myra Vaikul Latest Video ) झिंगाट डान्स सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. परीपुढे सर्व मोठी मंडळी डान्समध्ये मात्र फिकी पडल्याचे दिसत आहे.
परीचा वरातीमधील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. यामध्ये यश घोड्यावर बसून नवरोबा झाल्याचे दिसत आहे. तर परीसोबत समीर, शेफाली व चौधरी परिवार धमाल डान्स करताना दिसत आहे. मात्र परीचा गॉगल घालून हटके स्वॅग सगळ्याचे लक्षवेधून घेत आहे. तिच्या झिंगाट डान्सपुढं वरात फिकी पडल्याचे दिसत आहे. तिच्या लाडक्या समीर काकानं तिला वरातीत उचलून घेतल्याचे देखील दिसत आहे. चाहत्यांना देखील परीचा डान्स प्रचंड आवडलेला दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत लवकरच नेहाच्या मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच सेटवर पार पडले होते. ह्या आठवड्यात प्रेक्षकांना हे सोहळे पाहता येणार आहेत. आता नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याचे चित्रीकरण देखील पार पडले आहे. 12 जून रोजी एक तासाच्या विशेष भागात हा लग्न सोहळा प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक यश आणि नेहाचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत छोटी परी म्हणजे मायरा वायकुळ तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अनेकजण परीसाठी आम्ही मालिका पाहात असल्याचे सांगताना दिसताता. यश आणि नेहाचं लग्न असलं तरी परीच्या प्रत्येत लुकन चाहत्यांचे लक्षवेधून घेतलं आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.