मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Happy Birthday Yami Gautam : बनायचं होतं IAS पण वडिलांच्या 'त्या' मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

Happy Birthday Yami Gautam : बनायचं होतं IAS पण वडिलांच्या 'त्या' मैत्रिणीमुळे घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय

यामी गौतम

यामी गौतम

यामीच्या मनात मात्र IAS होण्याचं स्वप्न होतं. तिला केवळ अभ्यास करायचा होता. पण घरी आलेल्या पाहुण्यांनी तिचं स्वप्नचं बदलून टाकलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 28 नोव्हेंबर :आयुष्यात पुढे जात असताना प्रत्येक जण काहीतरी होण्याचं स्वप्न घेऊन आलेलं असतं.  पण कधी कधी आपण कितीही प्लानिंग केलं तरी प्रत्यक्षात मात्र काही तरी वेगळंच घडतं. असंच काहीस झालंय फेअर अँड लव्हली गर्ल यामी गौतमबरोबर. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला भविष्यात IAS व्हायचं होतं पण नशीब तिला बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत घेऊन आलं.  यामी आज तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं तिच्याया बॉलिवूड जर्नीविषयी जाणून घेऊया.

यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला. लहानपणाासून ती थोडी लाजरी बुजरी होती. एका सामान्य मुलीसारखी ती होती. पण तिला IASबनून देशाची सेवा करायची होती.  पण एक दिवस असं काही घडलं की तिच्या स्वप्नांनी यूटर्न घेतला आणि ती थेट बॉलिवूडची अभिनेत्री झाली. यामीची अभिनेत्री होण्याची स्टोरी देखील इट्रेस्टिंग आहे.  एक दिवस यामीच्या घरी पाहुणे आले होते. यामीच्या बाबांच्या मित्राची पत्नी टेलिव्हिजन अभिनेत्री होती. घरी येताच तिची नजर यामीवर पडली. तेव्हा तिनं यामीच्या घरच्यांना यामीमध्ये अभिनय करण्याचं टॅलेंट असल्याचं सांगितलं.

हेही वाचा- Shefali Shah: एकेकाळी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती शेफाली शाह; पत्र पाठवून दिली होती कबुली

घरी आलेल्या त्या अभिनेत्रीनं यामीच्या आईला तिला थिएटर जॉइन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर  त्यांनी यामीचं फोटोशूट केलं आणि ते मुंबईच्या एका नामवंत प्रोडक्शन हाऊसला पाठवले.  प

LAWचा अभ्यास सोडून सुरू केला अभिनय

यामी लॉ चाअभ्यास करत होती.  पण तेव्हा काही तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. तिनं लॉ चा अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतला. अभ्यास सोडल्यानंतर तिच्या आईनं तिला अभिनय करून बघ असा सल्ला दिला.त्यानंतर यामीनं मॉडेलिंग सुरू केलं. या सगळ्यात तिच्या आईनं तिला खूप सपोर्ट केला.

यामीनं 'चांद के पार चलो' या शो मधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं.  त्यानंतर ती 'यह प्यार न होगा कम' मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. यामीचा अभिनय प्रेक्षकांना आवडला त्यानंतर यामी गौतमी घराघरात ओळखली जाऊ लागली.

टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर यामीनं 'विक्की डोनर' या सिनेमातून  बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'उरी', 'काबिल', 'बाला', 'अ थर्सडे' यासारख्या सिनेमात तिनं काम केलं.  सिनेमा आणि टेलिव्हिजनबरोबरच यामीनं अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. 'फेअर अँड लव्हली' सारख्या प्रसिद्ध जाहिरातीत काम केलं. तिच्या अभिनय प्रवासातील ती जाहिरात खूप प्रसिद्ध झाली. आजही यामी गौतमीला फेअर अँड लव्हली गर्ल म्हणून ओळखलं जात आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News