पराभवानंतर कोहलीवर भडकला अभिनेता, म्हणाला- 'सोडून दे कॅप्टन्सी'

पराभवानंतर कोहलीवर भडकला अभिनेता, म्हणाला- 'सोडून दे कॅप्टन्सी'

तू कधी आयपीएल जिंकू शकत नाही, मग वर्ल्ड कप तर विसरूनच जा. तुला हे माहीत असायला हवं होतं की इतिहासातला तू सर्वात वाईट कर्णधार आहेस.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै- वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भाराताच पराभव करत अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क केलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीविरुद्धचा राग स्पष्ट दिसत आहे. संघाटा कर्णधार असूनही ही निर्णायक सामन्यात फक्त एक धाव करत तो बाद झाला होता. कोहलीच्या या परफॉर्मन्सनंतर क्रिकेट प्रेमी त्याला अनेक गोष्टी सुनवत आहेत. अभिनेता कमाल आर खानने (केआरके) त्याच्या मनातला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.

एवढंच नाही तर केआरकेने कोहलीला कर्णधारपद सोडण्याचाही सल्ला दिला. बुधवारी उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर केआरकेने सलग ट्वीट करत आपला राग व्यक्त केला. त्याने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'टीम इंडियाचा सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी न्यूझीलंडला कमी लेखलं. त्यांना हा सामना आपण सहज जिंकू असंच वाटलं.' त्यानंतरच्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, आम्ही जिंकू किंवा हरू चाहत्यांनी दोन्ही स्थितीत त्यांना पाठिंबा दिला पाहिदे असं विराट कोहली म्हणाला होता. पण भावा तू आम्हाला आधी हे सांग की आपण जिंकलो कधी होतो. तुला तर आयपीएलही जिंकता आलं नाही. तुला असं बोलायला पाहिजे की, तू एक सतत हरणारा खेळाडू आहेस आणि तरी लोकांनी तुला सर्वोत्तम खेळाडू म्हटलं आहे.

केआरकेने सामन्यानंतर विराट कोहलीच्या ट्वीटचाही चांगलाच समाचार घेतला. विराटने लिहिले होते की, 'ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, मी त्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही हे क्षण अविस्मरणीय केले. आपण सारेच निराश आहोत. समान भावनाच आपल्या मनात आहेत. आम्ही ते सर्व केलं जे आम्ही करू शकत होतो. जय हिंद.'

या ट्वीटवर कमेंट करताना केआरकेने लिहिले की, 'याचा अर्थ असा की तू याहून चांगलं खेळू शकत नाहीस. तू कधी आयपीएल जिंकू शकत नाही, मग वर्ल्ड कप तर विसरूनच जा. तुला हे माहीत असायला हवं होतं की इतिहासातला तू सर्वात वाईट कर्णधार आहेस. तू कर्णधार पद सोडून का नाही दे. पण जर तू असं केलंस तर तुला जाहिराती तरी कशा मिळतील.' एकीकडे केआरकेने टीम इंडियाचा समाचार घेतला असला तरी अनेक बॉलिवूड कलाकारांनी भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. यात अनुपम खेर, अमिताभ बच्चन, रणवीर सिंगच्या नावाचा समावेश आहे.

Sand Ki Aankh Teaser: घरच्यांवरच गोळी चालवणाऱ्या तापसी- भूमीचा अॅक्शनपॅक्ड स्वॅग

अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं

‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान आला पॅनिक अटॅक, शेअर केला जीवघेणा

बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची

First published: July 11, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading