मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

World Bollywood Day 2022: बॉलिवूडविषयी या खास गोष्टी माहिती आहेत का? वाचून वाटेल आश्चर्य

World Bollywood Day 2022: बॉलिवूडविषयी या खास गोष्टी माहिती आहेत का? वाचून वाटेल आश्चर्य

आज 24 सप्टेंबर रोजी जागतिक बॉलिवूड दिवस साजरा केला जातो. 'बॉलिवूड' हा शब्द 1970 च्या दशकात निर्माण झाला. बॉलिवूड हा केवळ एक शब्द नाही तर चाहत्यांसाठी एक भावना आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 24 सप्टेंबर : आज 24 सप्टेंबर रोजी जागतिक बॉलिवूड दिवस साजरा केला जातो. 'बॉलिवूड' हा शब्द 1970 च्या दशकात निर्माण झाला. बॉलिवूड हा केवळ एक शब्द नाही तर चाहत्यांसाठी एक भावना आहे. कलाकार असोत, चित्रपट असोत, गाणी असोत, संवाद असोत, कथानक असो, किंवा फॅशन असोत, बॉलिवूडचे चाहते हिंदी चित्रपटसृष्टीतून खूप प्रेरणा घेत असतात. त्यामुळे आज आनंदात, जल्लोषात जागतिक बॉलिवूड दिवस साजरा केला जातो.

1970 च्या दशकापर्यंत, भारतातील चित्रपट उद्योग अमेरिकन हॉलिवूड उद्योगाला मागे टाकण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बॉलिवूड हे टोपणनाव मिळाले, जे बॉम्बे आणि हॉलिवूड या दोन शब्दांचे संयोजन आहे. बॉलिवूड चित्रपटांबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अनेक चित्रपटांनी जागतिक स्तरावर ठसा उमटवला आहे.

हेही वाचा -  'रिव्ह्यू वाचून काही फायदा...'; हे काय बोलून गेली Alia Bhatt आणि का?

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार

राजेश खन्ना यांना बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जात होतं. त्यांच्या ब्लॉकबस्टर क्लासिकमध्ये आराधना, इत्तेफाक, खामोशी, सफर, कटी पतंग, आन मिलो सजना, आनंद आणि हाथी मेरे साथ  यांचा समावेश आहे.

सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट

शाहरुख खान आणि काजोलचा आयकॉनिक रोमँटिक चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंग' ने एक बेंचमार्क सेट केला आहे. हा चित्रपटगृहांमध्ये सर्वाधिक काळ चालणारा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटातून किंग खान म्हणजेच शाहरुख खान एक रोमँटिक अभिनेता म्हणून समोर आला आहे. अजूनही मुंबईच्या मराठा मंदिरात हा चित्रपट दाखवला जातो.

100 कोटींचा पहिला चित्रपट

1982 मध्ये आलेला मिथुन चक्रवर्तीचा 'डिस्को डान्सर' चित्रपट जगभरात 100 कोटींचा गल्ला पार करणारा पहिला भारतीय चित्रपट होता. त्यानंतर, सलमान खान-माधुरी दीक्षित यांच्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार केला.

सगळ्या बॉलिवूड प्रेमींना जागतिक बॉलीवूड दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Madhuri dixit, Salman khan, Shah Rukh Khan