लग्नाच्या आड येतंय 'सौंदर्य', सर्वांत सुंदर मुलीची विचित्रच आहे अडचण

लग्नाच्या आड येतंय 'सौंदर्य', सर्वांत सुंदर मुलीची विचित्रच आहे अडचण

एका ब्युटी क्वीनचं लग्न काही केल्या जुळत नाहीय. कारण ऐकून तुम्हीदेखील व्हाल हैराण

  • Share this:

नॉर्थ वेल्स,22 ऑक्टोबर : एका ब्युटी क्वीनचं लग्न काही केल्या जुळत नाहीय. तिचं लग्न न होण्यामागील कारण ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. अतिशय सुंदर असल्या कारणामुळे या ब्युटी क्वीनला तिच्या पसंतीचा पार्टनरचा भेटत नाहीय, असा दावा तिनं केला आहे. जॉय स्टैर्ले (23 वर्ष) असं या ब्युटी क्वीनचं नाव आहे. ती North Wales च्या Llandudno(नॉर्थ वेल्सच्या लँड्डुनो) येथील रहिवासी आहे. स्टैर्लेनं गेल्या काही वर्षात देशभरातील कित्येक सौंदर्य स्पर्धांचे किताब पटकावले आहेत. सौंदर्यवती असल्याच्या कारणामुळे चांगली मुलं भेटत नसल्याचा दावा स्टैर्लेनं केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चुकीची माणसं तिच्याकडे माणसं आकर्षित होतात, असं वेगळंच दुखणं तिचं आहे. स्टैर्लेनं सध्या एका नवीन टीव्ही शोसाठी ब्युटी पेजेंटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मेकअपविनाच मुलींनी सीरिअस ब्लाइंड डेटवर जायचं, अशी या Showची अजब थीम आहे.

(वाचा : बॉलीवूड अभिनेत्रीनं घेतली कोटींची मर्सिडीज, आईची आठवण अशी जपली)

'नॉर्थ वेल्स लाइव'च्या माहितीनुसार, देखणा चेहरा, शारीरिक आकर्षणाव्यतिरिक्तही एक सुंदर नातं जोडता येतं, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

जॉय स्टैर्लेने 2016मध्ये मिस सुपरनॅशनल वेल्सचा किताब जिंकला होता. यासह तिनं अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये पारितोषिकं जिंकली आहेत. आगामी बीबीसी वेल्सच्या ब्यूटी क्वीन सीरिजमध्ये ती झलक पाहायला मिळणार आहे. 

(वाचा : समद्या गावाला झालिया लग्नाची घाई! रणबीर-आलियाचं वेडिंग कार्ड VIRAL)

अनोख्या शोसंदर्भात जॉयनं सांगितलं....

एखाद्या व्यक्तीला डेट करताना शोमध्ये मेकअप करण्याची परवानी नसल्यानं जॉय किचिंतशी भावुक झाली आहे. थोडसं काजळ का होईन, पण मी नेहमीच मेकअप करते, अशी भावना जॉयनं व्यक्त केली.

(वाचा : SEX आणि इंटीमेसीवर इलियाना डिक्रूझचं बोल्ड विधान, म्हणते हे तर...)

मेकअपविना वावरण्याची सवय...

नो मेकअपसंदर्भात जॉयनं सांगितलं की, विशेष ककून एका ब्युटी क्वीनसाठी मेकअप म्हणजे एखाद्या सुरक्षेप्रमाणे असतं. यामध्ये दिसण्याच्या बाबतीत जितके परफेक्ट दिसता येईल, तितके छान दिसण्याचा प्रयत्न केला जातो. पण आपण नेहमीच परफेक्ट दिसू शकत नाही, असा आत्मविश्वास या शोमुळे मला मिळाला आहे.

मी जशी राहते, दिसते त्यामुळे माझ्याकडे विचित्र मुलंच आकर्षित होतात, आणि चांगली मुले माझ्यासोबत बोलताना संकोचतात. एखादा दयाळू, कुटुंबाकडे लक्ष देणारा, करिअरला महत्त्व देणाऱ्या मुलाच्या शोधात असल्याचंही जॉयनं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 09:59 AM IST

ताज्या बातम्या