Home /News /entertainment /

रानू मंडल पाठोपाठ बहीणही झाली स्टार, कीर्तनाच्या चालीवर गायलं 'तेरी मेरी कहाणी'

रानू मंडल पाठोपाठ बहीणही झाली स्टार, कीर्तनाच्या चालीवर गायलं 'तेरी मेरी कहाणी'

रानू मंडल यांच्या सारखीच दिसणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    मुंबई,06 मार्च:रानू मंडल यांच्या सारखीच दिसणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तर या महिलेला रानू मंडल यांची बहीण असल्याचं म्हटलं आहे. पण व्हिडीओमध्ये असलेली ती महिला नेमकी कोण आहे, हे माहीत नसलं तरी तिचा चेहरा रानू मंडल यांच्यासारखा आहे. याआधी सोशल मीडियावर रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांच्या गाण्यांच्या व्हिडीओ फार व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या 'तेरी मेरी कहाणी' गाण्याने तर नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतल होत. आता रानू मंडलच हे गाणं आता तिच्या बहिणीने म्हटल्याची चर्चा आहे. तसा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कपाळापासून नाकापर्यंत टिळा लावलेली महिला रानू मंडलच हे गाणं म्हटलं आहे. या व्यक्तीचा चेहरा अगदी रानू मंडळसारखाचं दिसत असल्यानं ती रानूची बहीण असल्याची चर्चा रंगली होती. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी रानू मंडलप्रमाणेच या व्हिडीओला चांगलीच पसंती दिली आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी शेअर केला आहे. हे वाचा:रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ? चाहत्यांवर रागावणं पडलं महागात पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गात स्वतःचं पोट भरणाऱ्या सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल एका रात्रीत स्टार झाल्या होत्या. बॉलिवूडचा प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्या त्याच्या हॅप्पी हार्डी अँड हीर या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली आणि त्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. सुरूवातीला नेटकऱ्यांनी देखिल रानू मंडळ यांना चांगलीच पसंती दिली. हे वाचा:मुलीच्या घटस्फोटानंतर बॉलिवूड अभिनेत्री म्हणते, ‘लग्नापेक्षा लिव्ह-इनमध्ये राहा'
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या