मुंबई, 28 जानेवारी : बॉलिवूड सिनेमांच्या अभिनेत्यांना आपल्या इशाऱ्यावर नावणारे कोरिओग्राफर्स यांच्या नव्या आणि जुन्या संघटनेत वाद सुरू असतानाच आता कोरिओग्राफर गणेश आचर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडचा नावाजलेला कोरिओग्राफर म्हणून ओळखला जाणाऱ्या गणेश आचार्यवर एक महिला कोरिओग्राफरनं गंभीर आरोप केले आहेत. गणेश आचार्यनं अडल्ट व्हिडीओ पाहण्यासाठी जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोप या महिला कोरिओग्राफरनं केला आहे.
ANI नं केलेल्या ट्विटनुसार, ‘मुंबईमधील 33 वर्षीय महिला कोरिओग्राफरनं इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनचे महासचिव गणेश आचार्यच्या विरोधात राज्य महिला आयोग आणि अंबोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. या महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, गणेश आचार्य तिला या इंडस्ट्रीमध्ये काम मिळू देत नाही. तसेच कामाच्या बदल्यात तो कमिशन मागतो आणि यासोबतच जबरदस्तीनं अडल्ट व्हिडीओ पहायला लावतो.’
आई-वडीलांच्या लग्नाआधीच झाला अभिनेत्रीचा जन्म, ब्रेकअपनंतर गेली नशेच्या आहारी
स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचं म्हणणं आहे की, गणेश आचार्य जेव्हापासून इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी झाला तेव्हापासून त्यानं तिला अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली आहे.
शहांचा भाजप कार्यकर्त्याच्या घरी जेवणावर ताव, अभिनेत्रीला सुचला फिल्मी डायलॉग

कोरिओग्राफर गणेश आचार्यनं काही दिवसांपूर्वीच एक नवी डान्सर असोसिएशन तयार केली आहे. ज्याच नाव ऑल इंडिया फिल्म, टेलिव्हिजन अँड इव्हेंट डान्सर्स असोसिएशन (AIFTEDA)आहे. याबाबत सीडीएनं चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी गणेश आचार्यनं AIFTEDA ची आवश्यकता का आहे याची कारणं युट्यूब व्हिडीओमधून सांगितली होती आणि तेव्हापासून तो चर्चेत होता.
दीपिका पदुकोणने केली पुढची घोषणा; Instagram स्टोरीमध्ये काय सांगितलं पाहा मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.