नेमकं काय घडलं ते येऊन सांगा, महिला आयोगाची तनुश्री-नानांना नोटीस

नेमकं काय घडलं ते येऊन सांगा, महिला आयोगाची तनुश्री-नानांना नोटीस

तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश देण्यात आले आहेत

  • Share this:

मुंबई, 09 आॅक्टोबर : अभिनेत्री तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलीये. महिला आयोगाने अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावत १० दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. तसंच तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

तनुश्री दत्ताने आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं म्हटलंय. मुंबई पोलिसांकडुन याबाबत आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल आयोगाने मागविला आहे.

सिनेसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसंच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसंच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे. यादृष्टीनेच कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, २०१३ या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिट स्थापन करावी असं निर्देश आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.

तनुश्रीने सोमवारी रात्री महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तीने केली होती.

याआधी तनुश्री दत्ताने ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये नाना पाटेकर, निर्माते सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य ह्यांच्याविरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, सोमवारी नाना पाटेकर यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली खरी पण दोनच मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली. जे १० वर्षांपूर्वी खरं होतं तेच आताही खरं आहे असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले. तसंच माझ्या वकीलाने कुणाशीही बोलायचं नाही असं सांगितलंय त्यामुळे मी कुणाशीही बोलणार नाही असं नानांनी स्पष्ट केलं होतं.

====================================================================

PHOTOS : नाना पाटेकरांंनंतर याही सेलिब्रिटींवर लागले गैरवर्तनाचे आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 04:53 PM IST

ताज्या बातम्या