VIDEO : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकानं करुन दिली आठवण

VIDEO : घागरा न घालताच सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकानं करुन दिली आठवण

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल ज्यात ती घागरा न घालताच मालिकेच्या सेटवर पोहोचलेली दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : एकता कपूरची लोकप्रिय टीव्ही मालिका ‘कसौटी जिंदगी की 2’ प्रेक्षकांच्या खूपच पसंतीत उतरला आहे. या शोमधील स्टार कलाकारांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या या मालिकेती मुख्य नायिका अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती घागरा न घालताच मालिकेच्या सेटवर पोहोचलेली दिसत आहे. हा एक बिहाइंड द सीन्स व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ स्वतः एरिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलेल्या या व्हिडीओमध्ये एरिका पूर्णपणे ट्रेडिशनल लुकमध्ये दिसत आहे. पण यातील खास गोष्ट अशी की ती लहंग्याचा घागर घालणंच विसरुन गेली आहे. या व्हिडीओमध्ये एरिका घागरा न घालता फक्त जीन्स घालूनच सेटवर पोहोचली. त्यानंतर तिला खुद्द दिग्दर्शकानं घागरा न घातल्याची आठवण करुन दिली. एरिकानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आधी फक्त शर्ट घालून बाहेर पडली, आता मेकअपमुळे फसली मलायका अरोरा

हा व्हिडीओ शेअर करताना एरिकानं लिहिलं, ‘यावेळी दिग्दर्शकाचा हुकूम.’ या व्हिडीओवर प्रेक्षक वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. काहींनी एरिका खूपच विनोदी असल्याचं म्हटलं आहे. तर काहीनी लिहिलं, मी हसून हसून मरेन. याशिवाय एरिकाच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांच्याही कमेंट पाहायला मिळत आहेत.

सलमान खानचा ‘दबंग 3’ अडकला वादात, हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप

मालिकेत बहीण-भाऊ, खऱ्या आयुष्यात मात्र करतायेत एकमेकांना डेट

=========================================================

Published by: Megha Jethe
First published: November 27, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading