मुंबई, 8 नोव्हेंबर : बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि पॅपराजी यांच्यामध्ये एक खास बॉंडिंग आहे. फोटोग्राफर्सच्या माध्यमातून लोकांमध्ये कलाकारांचे अपडेट मिळत असतात. कोरोनाव्हायरसमुळे दोघांमधील अंतर वाढलं होतं. नुकतच दीपिका पादुकोनला धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं. हे कार्यालय मुंबईत खार येथे स्थित आहे.
फ्रीप्रेसजरनल डॉट कॉमनुसार दीपिका पादुकोनने फोटोग्राफर्सवर नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी घडलेल्या एक घटनेनुसार दीपिका आणि अनन्या पांडे खार येथील धर्मा प्रॉडक्शनच्या जुन्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आली होती. दोघींनी पॅपराजींना फोटो दिले. काही फोटोग्राफर्सनी दीपिकाच्या गाडीचा पाठलाग केला. रिपोर्टनुसार पॅपराजीना वाटलं की दीपिका तिच्या सासरी रवाना झाली आहे. रणवीरच्या आई-वडिलांच्या घरी जाण्याऐवजी दीपिका हॉटेल ताज लँड्स येथे पोहोचली. हॉलेटमध्ये दीपिका एका मीटिंगसाठी गेली होती. यादरम्यान दीपिकाच्या ड्रायव्हरने पाहिलं की काही फोटोग्राफर तिचा पाठलाग करीत आहे. अशात गाडी थांबल्यानंतर दीपिकाचे बॉडीगार्ड बाहेर आले व पॅपराजींना ओरडू लागले. दोघांमध्ये तू तू - मै मै झाली. ज्यानंतर दीपिका गाडीतून उतरली.
तिने दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दीपिका फोटोग्राफर्सवर भडकली व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दीपिका नुकतीच गोव्यातून परतली आहे. ती गोव्यात शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. या चित्रपटात सिद्धार्थ चतुर्वेदी, दीपिकासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.