सुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून? पुढच्या भागात नव्या गेस्टची होणार एंट्री
सुपर डान्सरची खुर्ची गेली शिल्पाच्या हातून? पुढच्या भागात नव्या गेस्टची होणार एंट्री
शिल्पाचीही पोलिसांनी कसून चौकशी केली होती. तर याचा परिणाम तिच्या करिअरवरही दिसून येत आहे. पोलिसांच्या चौकशीतही शिल्पाने याचा उल्लेख करत तिच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला असल्याचं म्हटलं होतं.
मुंबई 27 जुलै : मागील आठवडाभरापासून राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लिल चित्रफिती प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीही (Shilpa Shetty) मोठ्या अडचणीत सापडली आहे. शिल्पाचीही पोलिसांनी कसून चौकशी केली होती. तर याचा परिणाम तिच्या करिअरवरही दिसून येत आहे. पोलिसांच्या चौकशीतही शिल्पाने याचा उल्लेख करत तिच्या प्रतिमेला मोठा धक्का लागला असल्याचं म्हटलं होतं. तर तिच्या हातून काही मोठे ब्रँड्सही गेले असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं होतं, तर आता ती परिक्षण करत असलेला शो ‘सुपर डान्सर’मधूनही (Super Dancers chapter 4) तिला बाहेर पडावं लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सतत दोन आठवडे आता ती गैरहजर आहे.
19 जुलैला उशीरा पोलिसांनी राजला अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असणारं शुट शिल्पाने रद्द केलं होतं. व त्यासाठी ती गैरहजर राहिली होती. तेव्हा कार्यक्रमात गेस्ट म्हणून आलेली अभिनेत्री करिश्मा कपूर शिल्पाच्या जागेवर बसली होती. तर आता दुसऱ्या आठवड्याचही शुटींग सुरू झालं आहे. व याही वेळेस ती गैरहजर आहे.
या आठवड्यात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता शिल्पाच्या कार्यक्रमातील वापसीवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. शिल्पाला सुपर डान्सर्सची खुर्ची सोडावी लागणार असाही प्रश्न निर्माण होत आहे.
तर नुकतीच न्यायालयात राज कुंद्राची सुनावनी झाली त्यात राजला आणखी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय शिल्पाचीही पुन्हा एकदा चौकशी केली जाऊ शकते असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान अद्याप सोनी टीव्ही आणि शिल्पा यांच्यात कोणतही संभाषण झालं नाही.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.