S M L

रणबीर कपूर 2020मध्ये आलियाशी लग्न करणार? पहा त्याचं उत्तर

रणबीर कपूर आणि आलिया भट हे आता रिलेशनशीपमध्ये असल्याचं खुद्द रणबीरनेच मान्य केलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 24, 2018 11:00 AM IST

रणबीर कपूर 2020मध्ये आलियाशी लग्न करणार? पहा त्याचं उत्तर

मुंबई, 22 जून : रणबीर कपूर आणि आलिया भट हे आता रिलेशनशीपमध्ये असल्याचं खुद्द रणबीरनेच मान्य केलंय. मात्र आलियाला नुकतंच या नात्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा लग्न करायला अजून बराच अवधी काळ असल्याचं तिने सांगितलं.

मात्र त्याआधी लिव्ह इनमध्ये राहणार का, या प्रश्नावरही तिने नाही असं थेट उत्तर दिलंय. जेव्हा मला एखादी व्यक्ती आवडेल तेव्हा त्याच्याशी लिव्ह इनमध्ये रहाण्यापेक्षा मी थेट लग्न करणं पसंत करेन असं आलियाने ठामपणे सांगितलंय. त्यामुळे रणबीर आलिया लिव्ह इनमध्ये राहण्याची शक्यता मावळलीय.

हेही वाचा


विरानुष्काने कचऱ्यासाठी ज्याला फटकारलं,त्याने पाठवली नोटीस

मामा-भाच्याच्या नात्यात दुरावा, गोविंदा का आहे कृष्णावर नाराज ?

'इंडिया टुडे'शी बोलताना रणबीर कपूर म्हणाला, आम्ही काहीही बोललो तरी त्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीनं घेतलं जातं. त्यामुळे आलिया आणि माझ्या नात्याबद्दल मी काही बोलणार नाही.

Loading...
Loading...

करण जोहरच्या ब्रम्हास्त्र सिनेमात दोघं काम करतायत. त्यात अमिताभ बच्चनही आहेत. आलिया भटनं नुकतंच नितू कपूर आणि रणबीरच्या बहिणीसोबत डिनर केला होता. ती ऋषी कपूरलाही भेटायला गेली होती. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहिलंय.

रणबीर कपूर आणि दीपिकाही काही महिने रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर तो कतरिना कैफसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. आता आलियासोबतचं त्याचं नातं कसा रंग घेतंय ते पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 10:18 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close