मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bhagya Dile Tu Mala : कावेरी बांधणार राजवर्धनला राखी? 'भाग्य दिले तु मला' मालिकेत मोठा ट्विस्ट

Bhagya Dile Tu Mala : कावेरी बांधणार राजवर्धनला राखी? 'भाग्य दिले तु मला' मालिकेत मोठा ट्विस्ट

Bhagya dile tu mala

Bhagya dile tu mala

'भाग्य दिले तू मला' या मालिकेतील काकू - बोक्याच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. राजवर्धन आणि कावेरी यांच्यात मैत्रीचं नातं फुलत असताना त्यांच्या नात्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे.

  मुंबई, 12 ऑगस्ट : सध्या सगळ्या मालिकांमध्ये सणांची लगबग दिसत आहे. मालिकांमध्येही मंगळागौर, रक्षाबंधन हे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. सगळ्या कुटुंबांमध्ये आनंदाचं  वातावरण पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकांमध्ये या सणांनुसार  बदल केलेला पाहायला मिळत आहे. मराठी मालिकांमध्ये या सण समारंभाच्या काळात मालिकांमध्ये ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीवरील  'भाग्य दिले तु मला' या मालिकेत सुद्धा रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. पण त्यासोबतच मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. येणाऱ्या काळात मालिकेतील कावेरी आणि राजवर्धन यांच्या नात्यात अजून दुरावा येण्याची आहे. या दोघांच्या नात्याचा अर्थ बदलू शकतो. कलर्स वाहिनीवर 'भाग्य दिले तु मला' ही मालिका चांगलीच गाजते आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर असून अनेक ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळत आहेत. राज हा त्याच्या आईसोबत राहत न राहता तो कावेरी आणि वैदहीसोबत त्यांच्या घरी राहत होता. कावेरी आणि राज यांच्यामध्ये छान मैत्री झालं होती. दोघेही एकमेकांना सुखदुःखांत साथ देत होते. पण मालिकेत एक ट्विस्ट आला होता.  माहेरचा चहाचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी राज, कावेरी, रत्नमालाशीत अनेक जण उपस्थित असताना  राज आणि कावेरीचे काही फोटो समोर आले होते. त्यानंतर हे दोघे जण  लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा झाली. त्यामुळे या दोघांचं नातं पूर्णपणे बदललं.राज कावेरी एकमेकांपासून काहीसे दूर गेले. हेही वाचा - Balumamachya Navan Chang Bhala : बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार पण कावेरी आणि राज या दोघांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव हळूहळू होताना दिसतेय. त्यातच मालिकेचा अजून एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मालिकेत रक्षाबंधन साजरे केले जात आहे. राजवर्धनला त्याच्या बहिणीने राखी बांधली आहे. कावेरी सुद्धा तिथेच आहे. तेवढ्यात सुवर्णा  कावेरीला राजवर्धनला राखी बांध असं सांगते. आता कावेरी मोठ्या अडचणीत सापडणार असं दिसतंय.
  कावेरी सुवर्णाच्या सांगण्यावरून खरंच  राजला राखी बांधणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण राजने त्याच्या मनातील भावना रत्नमालाला सांगितल्या आहेत त्यामुळे ती कावेरीला राखी बांधण्यापासून रोखणार का, त्यासोबतच कावेरीला राजवरील प्रेमाची जाणीव कधी होणार आणि हे दोघे एकमेकांकडे प्रेमाची कबुली कधी देणार हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. भाग्य दिले तू मला मालिकेत राजवर्धनची भूमिका अभिनेता विवेक सांगळे साकारत आहे. त्याचबरोबर कावेरीच्या भूमिकेत तन्वी मुंडले तर रत्नमालाची भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ या साकारत आहेत. सध्या मालिकेत रोज नवीन घडामोडी पाहायला मिळत आहे. एकीकडे   रत्नमाला आणि राजवर्धन या दोघांमधील दुरावा दूर झाला आहे पण दुसरीकडे कावेरी आणि राजवर्धन यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये काय घडेल हे बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Colors marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या