14 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ म्हणजे लाखों दिलों की धडकनच जणू...बॉलिवूडमध्ये येऊन आता कतरिनाला १५ वर्ष झाली आहेत. आपल्या बॉलिवूडमधल्या प्रवासावर कतरिना आता पुस्तक लिहिण्याचा विचार करतेय.
या पुस्तकाचे हक्क तिने एका प्रकाशकाला दिल्याचंही समजतंय. या पुस्तकाचं नाव 'बार्बी ड्रिम्स' असं असेल अशी चर्चा आहे.
कतरिना ही एकमेव अशी अभिनेत्री आहे की जिच्यासारखी दिसणारी बार्बी डॉल कंपनीने बनवलीये. त्यामुळेच तिच्या या पुस्तकाचं नाव असं ठेवण्यात येणार आहे. असं असलं तरीही या पुस्तकात कतरिनाच्या खाजगी आयुष्याबद्दल काहीही लिहिण्यात येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katrina kaif, कतरिना कैफ