मुंबई, 21 डिसेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर सुरू झालेलं बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात नवनवीने चेहरे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी NCB ने अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याला ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. त्याला आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले होते.
आज सकाळी साधारण 11 वाजता अर्जुन रामपाल चौकशीसाठी मुंबई NCB कार्यालयात हजर होता. यावेळी त्याचं चेहरा पडला असल्याचे सांगितले जात आहे. यामागे अर्जुन रामपालच्या दिल्ली येथील डॉक्टरने NCB ला दिलेला जबाब कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्जुन रामपालच्या दिल्ली येथील डाॅक्टरने प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासा केल्याची चर्चा आहे. ते यावर म्हणाले की, न्यायाधिशांसमोर मी माझा जबाब नोंदवला असून, मी NCB ला पूर्ण सहकार्य करत आहे. अर्जुन रामपालकडून NCB ने जप्त केलेल्या प्रतिबंधित औषधांबद्दल त्याने NCB ला दिलेल्या डाॅक्टर प्रिक्रिप्शन बाबत देखील बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. त्यामुळे अर्जुन रामपाल आजही प्रसार माध्यामांच्या कॅमे-यांना बगल देवून NCB कार्यालयात गेल्याचे सांगितले जात आहे. सलग 6 तास अर्जुन रामपालची चौकशी झाल्यानंतर आज अर्जुन रामपाल संतापलेला दिसत होता. आज अर्जुन NCB कार्यालयाबाहेर पडल्यानंतर त्याने प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले.
NCB सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपाल याने यापूर्वी आणि आता दिलेल्या जबाबात तफावत आढळली. त्याशिवाय त्याने दिलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्येदेखील गडबड असून शकते, अशी शक्यता आहे. गरज पडल्यास त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात मुंबई NCB ने एगीसीलाॅस नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. एगीसीलाॅलच्या चौकशीतून त्याची बहिण गॅब्रिलाला देखील दोन वेळा एनसीबीने चौकशीकरता बोलावले होते. एगीसीलाॅस हा अर्जुन रामपालचा मेव्हणा आहे तर गॅब्रिला ही अर्जुन रामपालची प्रेयसी आहे. या दोघांच्या चौकशीतून अर्जुन रामपालचे नाव समोर आले होते. त्यानुसार मुंबई NCB ने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला असता त्याचा घरी प्रतिबंधित औषधे सापडली होती. त्या प्रकरणी मुंबई NCB ने पहिल्यांदा अर्जुन रामपालला चौकशीकरता बोलावले होते. त्यावेळी मात्र अर्जुनने प्रतिबंधित औषधं डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेत असल्याचा खुलासा केला होता. पण NCB ने केलेल्या तपासात काही वेगळच आढळल्याने अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ झाली आहे. अर्जुन रामपाल आज NCB चौकशीनंतर कमालिचा संतापलेला दिसल्याची चर्चा आहे.
NCB चे संचालक समिर वानखेडे स्वत: या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या बाॅलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची समीर वानखेडे या नावाने झोप उडवली आहे. समीर वानखेडे हे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचे संचालक आहेत. गेले काही महिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत अंमली पदार्थ प्रकरणी समीर वानखेडे यांच्या कार्यालयात अनेक दिग्गज सेलिब्रिटींना हजेरी लावावी. तर काही सेलिब्रिटींना जेलची हवा देखील खावी लागली.