Home /News /entertainment /

'डाॅन 3' मध्ये अमिताभ-शाहरुखची जोडी येणार एकत्र? बिग बींनी दिला 'हा' इशारा

'डाॅन 3' मध्ये अमिताभ-शाहरुखची जोडी येणार एकत्र? बिग बींनी दिला 'हा' इशारा

अमिताभ बच्चन (Amitabh bhacchan) जेव्हाही कोणत्याही चित्रपटात सोबत झळकले त्या चित्रपटानं रेकाॅर्डब्रेक कमाई केली आहे. अशातच ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याचं समजतंय

  मुंबई, 19 जून : बाॅलिवूडचा बादशाह आणि शेहनशाह एकत्र आले म्हणजे तो चित्रपट ब्लाॅकबस्टर ठरलाच. शाहरुख खान (Shahrukh khan)आणि अमिताभ बच्चन (Amitabh bhacchan) जेव्हाही कोणत्याही चित्रपटात सोबत झळकले त्या चित्रपटानं रेकाॅर्डब्रेक कमाई केली आहे. मग ते 'मोहब्बतें'पासून 'कभी खुशी कभी गम'पर्यंत कोणताही चित्रपट असो. अशातच ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असून पुन्हा एकदा ब्लाॅकबस्टर द्यायला सज्ज झाल्याचं समजतं. याविषयी बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी थोडीशी कल्पना दिली आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी याविषयी कल्पना दिल्याचं दिसतंय. अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये शाहरुख खान एका चाहत्याप्रमाणे अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ घेताना दिसत आहे आणि अमिताभ बच्चन हे पोस्टर गाडीच्या बोनेटवर ठेवून पोस्टरवर सही करत आहेत. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आणि... अरे... पुन्हा त्याच जोशमध्ये येत आहे मी... डॉन'. त्याचबरोबर बिग बींनी डॉन 3 (Don 3) बनण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे पुन्हा ही जोडी डाॅन 3 च्या निमित्तानं एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
  डॉन 3 बनण्याची चर्चा इंटरनेटवर बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र आता अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो पाहून लवकरच चाहत्यांना गुडन्यूज मिळणार असल्याचं दिसतंय. नुकंतच अमिताभ बच्चन यांनी काही दिवसापूर्वी डाॅन चित्रपटाचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ज्यामध्ये त्यांनी दाखवले होते की 1978 मध्ये डॉन चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर मैलभर लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे डाॅन 3 चित्रपटाविषयी लवकरच काहीतरी घोषणा होण्याची चाहते आतुरतेचे वाट पाहत आहेत.
  अमिताभ यांनी 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या डॉन या चित्रपटाविषयीची एक खास पोस्ट शेयर केली. त्या पोस्टचा फोटो शेयर केल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बिग बी यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटाच्या पुढचा सिक्वल कधी येणार याविषयीही चाहते प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे याविषयी अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Entertainment, Shahrukh khan

  पुढील बातम्या