मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘लग्न करुन मी खूप मोठी चूक केली’; जीनत अमान यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

‘लग्न करुन मी खूप मोठी चूक केली’; जीनत अमान यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

जीनत अमान यांनी दोन वेळा लग्न केलं परंतु त्यांना खरं प्रेम मिळालं नाही. परिणामी लग्न करणं हिच सर्वात मोठी चूक होती असा धक्कादायक अनुभव त्यांनी सांगितला.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 जुलै: जीनत अमान (Zeenat Aman) या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. (Zeenat Aman movies) ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘हरे रामा हरे क्रिष्णा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे 70-80चं दशक त्यांनी गाजवलं होतं. परंतु फिल्मी करिअरसारखं यश त्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात मिळवता आलं नाही. त्यांनी दोन वेळा लग्न केलं परंतु त्यांना खरं प्रेम मिळालं नाही. परिणामी लग्न करणं हिच सर्वात मोठी चूक होती असा धक्कादायक अनुभव त्यांनी सांगितला.

‘दिलीप कुमारांची एक झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

जीनत अमान यांनी पहिलं लग्न मझर खान आणि दुसरं लग्न संजय खान यांच्यासोबत केलं होतं. हे दोन्ही प्रेम विवाहच होते. परंतु लग्नानंतर मात्र सर्व काही बदललं नात्यात दुरावा निर्माण झाला असा अनुभव जीनत अमान यांनी सांगितला. अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत जीनत अमान यांनी आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या घटस्फोटांचं कारणही सांगितलं.

मीरा चोप्राचे चित्रपट का झाले फ्लॉप? प्रियांकावर केला होता करिअर संपवल्याचा आरोप

त्या म्हणाल्या, “लग्नानंतर मी रुपेरी पडद्यावरून हळूहळू गायब झाले. माझं सर्व आयुष्य कुटुंबाभोवती फिरत होतं. मी माझ्या जबाबदाऱ्या चोख बजावत होते. परंतु तरी देखील मझर आणि माझ्यात खटके उडत होते. त्याचं आणखी एका दुसऱ्या तरुणीसोबत अफेअर होतं. त्यामुळे मानसिकदृष्ट्या मी मोडकळीस आले होते. दरम्यान मी गरोदर होते. परंतु त्यावेळी देखील माझी काळजी घेणारं कोणी नव्हतं. त्यानंतर आम्हाला एक मुलगा झाला. मला वाटलं त्यानंतर तरी आमच्या नात्यातील दुरावा संपेल. परंतु तसं काही झालं नाही. त्यामुळे अखेर मी मझरला घटस्फोट दिला. अन् असाच काहीसा अनुभव मला दुसऱ्या लग्नानंतरही आला त्यामुळे लग्नावरचा माझा विश्वास आता उडाला आहे.”

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment