'पानिपत' सिनेमा का पाहावा? राज ठाकरेंनी केलं 'हे' आवाहन

'पानिपत' सिनेमा का पाहावा? राज ठाकरेंनी केलं 'हे' आवाहन

या सिनेमात अर्जुन कपूर सदाशिवराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री कृती सेनन त्यांची पत्नी पार्वती बाईची भूमिका साकारत आहे

  • Share this:

मुंबई, 04 डिसेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमा रिलीज झाले त्यानंतर आता ‘पानिपत’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबदद्ल टि्वटकरून सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे राज ठाकरे यांचे चांगले मित्र आहे. राज यांनी पानिपत सिनेमाबद्दल टि्वट केलं आहे.

'पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा अविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतची लढाईकडे पहावंच लागेल. गोवारीकर यांचा पानिपत चित्रपट हा प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे संपूर्ण भारतीयांनी पाहावा', असं आवाहन राज ठाकरेंनी केली.

येत्या शुक्रवारी पानिपत हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात अर्जुन कपूर सदाशिवराव पेशव्यांची भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री कृती सेनन त्यांची पत्नी पार्वती बाईची भूमिका साकारत आहे. या सिनेमाची कथा पनिपतच्या युद्धाची कथा साकारण्यात आली असून अर्जुननं सदाशिवराव पेशव्यांच्या भूमिकेत फिट बसल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. तर कृती सेननं मराठमोळ्या वेशात सर्वांची मनं जिंकली आहेत. अभिनेता संजय दत्तनं मात्र, अहमद शाह अब्दालीच्या खलनायकी भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तो या सिनेमातून पुन्हा एकदा खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

First published: December 4, 2019, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading