भारती कपिलवर का झाली नाराज?

भारती कपिलवर का झाली नाराज?

भारती कपिलच्या शोच्या शूटच्या पहिल्याच दिवशी नाराज झालीय.एवढंच नाही तर पहिल्याच दिवशी तिच्यात आणि शोच्या क्रिएटिव्ह टीममध्ये भांडणंही झाली

  • Share this:

29जून : प्रसिद्ध कॉमेडियन भारती कपिलच्या शोच्या शूटच्या पहिल्याच दिवशी नाराज झालीय.एवढंच नाही तर पहिल्याच दिवशी तिच्यात आणि शोच्या क्रिएटिव्ह टीममध्ये भांडणंही झाली .कपिलच्या शोचे आधीच वाईट दिवस चालू असताना हा कपिलच्या शोला एक खूप मोठा झटका होता.

तर झालंय असं की भारती कपिलच्या शोमध्ये एन्ट्री करतेय. या शोमध्ये तिच्या एन्ट्रीचं हे शूट होतं . भारतीचा हा शूटचा पहिलाच दिवस होता. पण तिला तिचा एन्ट्रीचा सिन अजिबात आवडला नाही.या सिनमुळे ती खूप नाराज होती. यामुळे तिचं रात्री 8 पर्यंत कपिलच्या क्रिएटिव्ह टीमशी भांडण चाललं होतं.

 

आश्चर्याची बाब अशी की हा सिन तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेच हर्ष लिंबाचियानेच ओके केला होता. पण भारतीला तो काही पटला नाही .आणि शेवटी तिनं तो सिन बदलायला कपिलला भाग पाडलं . अखेर शोच्या टीमला तिच्यासमोर नमावं लागलं .शोचं शूट कॅन्सल झालं.

आता कपिलची टीम भारतीच्या एन्ट्रीसाठी एक नवी स्क्रिप्ट लिहितेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading