Pink नव्हे Yellow; मुलगी झाल्याची सोशल मीडियावर पोस्ट करताना विरुष्कानं का निवडला पिवळा रंग?
भरपूर चाहते असलेलं सेलिब्रिटी कपल म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) कायमच काहीतरी युनिक करताना दिसतात.
मुंबई, 13 जानेवारी : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohali) या सेलिब्रिटी दाम्पत्यानं 11 जानेवारीला मुलगी झाल्याची गूड न्यूज दिली. दोघांनी आपल्या पहिल्या बाळाचं, मुलीचं (First Baby Girl) स्वागत केलं. विराटनं आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडल्सद्वारे ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. पण पोस्ट करताना त्यांनी गुलाबी (pink) नव्हे तर पिवळ्या रंगाचा (Yellow Colour) वापर केला.
सामान्यपणे मुलगी झाली ही गुलाबी आणि मुलगा झाली की निळा रंग वापरण्याकडे लोकांचा कल असतो. विराट आणि अनुष्काला मुलगी झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांना बातमी दिली तेव्हा ही पोस्ट करताना त्यांनी पिंक कलरचा वापर केला नाही. तर आपल्या मुलीच्या आगमनाची बातमी देण्यासाठी पिवळ्या रंगांचीच निवड केली. असं का?
पोस्टमध्ये वापरलेल्या या पिवळ्या रंगातून दिसून येते की विरुष्काला आपल्या बाळाला लिंग आणि रंगावरून कोणतंही लेबल लावायचं नाही. तसंच या बेबी गर्लला तिचं आयुष्य तिला हवं तसं जगू द्यायचं आहे. असा संदेश त्यांना या पोस्टमधून समाजाला द्यायचा आहे, असं दिसून येतं.
अनुष्का आणि विराट अनेकदा अगदी जुनाट प्रथा, स्टिरिओटाइप्स (Stereotypes) तोडताना दिसले आहेत आणि यावेळीही त्यांनी पोस्टमध्ये हा पिवळा रंग वापरून अनेकांना प्रेरणा दिली आहे. व्होग मॅगझिनला (Vogue) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनुष्कानं सांगितलं होतं की, मुलांनी निळे आणि मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे घालावे हे मला पटत नाही आणि मान्यही नाही.
दरम्यान दोघंही आपल्या बाळाला इतक्या कमी वयात प्रसिद्धी देऊ इच्छित नाहीत. सोशल मीडियामध्ये आपल्या बाळाला व्यस्त ठेवण्याची त्यांची इच्छा नाही, कारण त्याबाबत निर्णय घेण्यास ते बाळ अजून सक्षम नाही, असं या सेलेब्रिटी जोडप्याला वाटतं. कोणत्याही मुलाला विशेष वागणूक देऊन ते इतरांपेक्षा वेगळं असल्याची भावना निर्माण करू नये; मात्र मोठ्यांना असं वागणं सोपं जात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.