The Kapil Sharma Show बंद का होतोय? सबकुछ बायकोसाठी.... कपिलनेच केला खुलासा
द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) बंद का केला जातोय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आता कपिल शर्मानं (Kapil Sharma) स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.
मुंबई 28 जानेवारी : कठीण काळातही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू खुलवणारा द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) आता प्रेक्षकांना पाहाता येणार नाही. हा शो बंद का केला जातोय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे, लोक अनेक अंदाज लावत असतानाच आता कपिल शर्मानं (Kapil Sharma) स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. हा शो बंद करण्याचं कारण दुसरं तिसरं काहीही नसून कपिलची पत्नी गिन्नी चतरथ आहे.
गिन्नी चतरथ दुसऱ्यांदा गरोदर असून पत्नीला वेळ देण्यासाठी कपिल हा शो काही दिवसांसाठी बंद करत आहे. कपिल शर्मानं गुरुवारी ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत #AskKapil च्या माध्यमांतून संवाद साधला. यावेळी त्यानं अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. याच वेळी एका चाहतीनं हा शो का बंद होत आहे, असा सवाल केला. यावर उत्तर देताना कपिल म्हणाला, की मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी माझ्या पत्नीसोबत घरी काही वेळ घालवायचा आहे. कपिलच्या या उत्तरानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
Bcoz I need be there at home with my wife to welcome our second baby https://t.co/wdy8Drv355
याशिवाय कपिलनं आपल्या इतर चाहत्यांसोबतही ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला आहे. चाहत्याच्या प्रश्नांवर त्यानं मजेदार उत्तरं दिली आहेत. एका चाहत्यानं मला तुमच्या शोमध्ये यायचं आहे, कसं येऊ असा सवाल केला आहे. यावर चाहत्याची फिरकी घेत चालत ये असं मजेशीर उत्तर कपिलनं दिलं आहे. तर, इतरांच्या मेसेजलाही रिप्लाय करत आज मी खूप फ्री असल्याचं कपिलनं म्हटलं आहे.