मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तनुश्री दत्ता का झाली होती बॉलिवूडमधून गायब?; 12 वर्षानंतर करतेय पुनरागमन

तनुश्री दत्ता का झाली होती बॉलिवूडमधून गायब?; 12 वर्षानंतर करतेय पुनरागमन

आता जवळपास 12 वर्षानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. आज तनुश्रीचा वाढदिवस आहे. आपल्या 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिनं हा सुखद धक्का आपल्या चाहत्यांना दिला.

मुंबई 19 मार्च: ‘आशिक बनाया आपने’ (Aashiq Banaya Aapne) या चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झालेली तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. परंतु ‘हॉर्न ओके प्लिज’ (Horn Ok Please) या चित्रपटादरम्यान अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळं तिचं करिअर एकाएकी संपली. आता जवळपास 12 वर्षानंतर ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. आज तनुश्रीचा वाढदिवस आहे. आपल्या 37व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिनं हा सुखद धक्का आपल्या चाहत्यांना दिला.

तनुश्री सध्या पुनरागमन करण्याची जोरदार तयारी करत आहे. ती तासंतास जीममध्ये व्यायाम करत आहे. गेल्या एक वर्षात तिनं तब्बल 35 किलो वजन कमी केलं आहे. शिवाय तिनं आपल्या नव्या लूकचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा नवा अंदाज पाहून चाहते देखील अवाक झाले आहेत. सध्या ती विविध चित्रपटांसाठी ऑडिशन देत आहे. तिच्याकडे काही चांगल्या पटकथा देखील आल्या आहेत. परंतु तिला नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारायची आहे. तिला पहिल्यासारखं केवळ बोल्ड व्यक्तिमत्व पडद्यावर दाखवायचं नाही त्यामुळं ती विचार करुनच चित्रपटांची निवड करणार आहे.

अवश्य पाहा - या अभिनेत्यानं सुरु केली फाटक्या जीन्सची फॅशन; आज महिलाही करतात फॉलो

अवश्य पाहा - गब्बरला मारताना दिसले होते ठाकूरचे हात; शोलेमधील Video होतोय व्हायरल

का झाली होती बॉलिवूडमधून गायब?

2007 साली तिनं नाना पाटेकरांवर लैंगिक गैरवर्तणुक केल्याचा आरोप केला होता. त्यामुळं ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातून तिला बाहेर काढण्यात आलं. अर्थात तिनं याविरोधात तक्रार देखील केली होती. परंतु हे आरोप तिला सिद्ध करता आले नाही. दरम्यान नाना पाटेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. केवळ माझी बदनामी करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा उलट आरोप त्यांनी तनुश्रीवर केला होता. मात्र वादग्रस्त प्रकरणामुळं तनुश्रीला चित्रपटात काम मिळणं थांबलं. परिणामी ती डिप्रेशनमध्ये गेली अन् एक दिवस बॉलिवूडमधून गायब झाली. परंतु आता तब्बल 12 वर्षानंतर ती पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Nana patekar, Social media viral