मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुष्मिता सेन होती पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमात; करणार होते लग्न...पण...

सुष्मिता सेन होती पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या प्रेमात; करणार होते लग्न...पण...

दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र तरी देखील त्याचं लग्न काही होऊ शकलं नाही. आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा ते अर्धवट राहिलेलं प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे.

दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र तरी देखील त्याचं लग्न काही होऊ शकलं नाही. आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा ते अर्धवट राहिलेलं प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे.

दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र तरी देखील त्याचं लग्न काही होऊ शकलं नाही. आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा ते अर्धवट राहिलेलं प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे.

मुंबई 23 मे: सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही कधीकाळी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. चित्रपटांसोबतच ती आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील कायम चर्चेत असायची. बॉलिवूडमधील तिची प्रेम प्रकरण हा तर चाहत्यांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. (sushmita sen love story ) दरम्यान सुष्मिता यशाच्या शिखरावर असताना पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वासिक अक्रम यांच्या प्रेमात पडली होती. (Wasim Akram) ते देखील तिच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र तरी देखील त्याचं लग्न काही होऊ शकलं नाही. आज कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा ते अर्धवट राहिलेलं प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे.

वासीम आणि सुष्मिताची पहिली भेट एका डान्स शोच्या सेटवर झाली होती. कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे भेटले आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं जाऊ लागलं. 2009 साली वासीम यांनी पत्नी हुमा हिच्यासोबत घटस्फोट घेतला होता. त्यामुळं दोघं आता आणखी जवळ येऊ लागले होते. काही वृत्तमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघं लग्न देखील करणार होते.

बनवाबनवी करणाऱ्या 'देवमाणसा'चा 'हृदयी वसंत...' वर भन्नाट डान्स, पाहा VIDEO

वासीम सुष्मिताच्या जगण्याच्या पद्धतीवर नाराज होते. सुष्मिता एक अभिनेत्री होती. त्यामुळे तिची लाइफस्टाइल आणि व्यग्र शेड्युलमुळे वसीम स्वतःला कमी लेखू लागले होते. सुष्मिताच्या कामामुळे तिला त्यांच्या नात्याला वेळ देता येत नव्हता. त्यामुळे वासीम चिडचिड करू लागले होते. अखेर त्या दोघांनीही आपल्या नात्यावर पुन्हा विचार करण्याचा निर्णय घेतला. अन् अखेर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर दोघांनी कधीही त्यांच्या नात्यावर भाष्य केलं नाही. जेव्हा कधी त्यांना याबाबत प्रश्न विचारला जातो तेव्हा ते उत्तर देणं टाळतात.

First published:

Tags: Entertainment, Sushmita sen wedding