असं काय घडलं होतं की, शाहरुखने गौरीला बुरखा घालायला, नमाज पढायला सांगितलं?

असं काय घडलं होतं की, शाहरुखने गौरीला बुरखा घालायला, नमाज पढायला सांगितलं?

शाहरुख खान (Shahrukh Khan)ची पत्नी गौरी खान (Gauri Khan)चा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूडच्या या आयडिअल कपलचे काही किस्से समोर आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर: शाहरुख खान (Shah Ruk Khan) ची पत्नी गौरी खान (Gauri Khan)चा  8 ऑक्टोबर हा वाढदिवस. शाहरुख आणि गौरी बॉलिवूडमधलं आयडियल कपल मानलं जातं. त्यांच्या लग्नाला आता 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. एवढी वर्षं हे दोघं प्रेमानं एकत्र नांदत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी शाहरुखने गौरीला सर्व नातेवाईकांच्या समोर गंमतीत बुरखा घालायला आणि नमाज पढायला सांगितलं होतं.

शाहरुख गौरीच्या प्रेमात पडला होता. तेव्हा त्याच्या करिअरला सुरुवातदेखील झाली नव्हती. 1984 साली शाहरुखने गौरीला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याला लव्ह अ‍ॅट फस्ट साईट झालं होतं. आणि तिथून सुरू झाला शाहरुख आणि गौरीच्या प्रेमाचा सिलसिला. 1 नाही 2 नाही तब्बल 6 रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं.

गौरीसाठी शाहरुख 5 वर्ष हिंदू झाला होता

शाहरुख आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले पण धर्म त्यांच्या प्रेमाच्या आड आला. दोघांच्याही घरातील कुटुबियांचा या लग्नाला पाठिंबा नव्हता. गौरीच्या कुटुंबासाठी शाहरुख 5 हिंदू झाला होता. पण अखेर तिच्या कुटुंबाला शाहरुखबद्दल खरी माहिती मिळालीच. पण शाहरुख आणि गौरीचं प्रेम पाहून तिच्या कुटुंबीयांचा विरोध मावळला आणि गौरीच्या घराच्यांनी लग्नाला परवानगी दिली.

शाहरुख आणि गौरीचं 3 वेळा लग्न

बॉलिवूडच्या या आयडिअल कपलने चक्क 3 वेळा लग्न केलं. सर्वात आधी त्या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर 26 ऑगस्ट 1991 रोजी त्यांचं मुस्लीम पद्धतीने लग्न (निकाह) झालं, तर 25 ऑक्टोबर 1991 या दिवशी हिंदू पद्धतीने त्यांनी पुन्हा लग्न केलं.

शाहरुखने एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबीयांनाही त्यांचा आंतरधर्मीय विवाह मान्य नव्हता. हा मुलगा गौरीचं नाव बदलणार आहे का?...तिचा धर्म बदलणार आहे का? अशा चर्चा शाहरुखच्या नातेवाईकांमध्ये होत होत्या. त्यावेळी शाहरुख गौरीला मस्करीमध्ये म्हणाला होता, उद्यापासून तुला बुरखा घालावा लागेल, नमाज पठण करावं लागेल. त्यावेळी त्याचे सगळे नातेवाईक शांतच झाले.

वास्तविक गौरीने धर्म बदललेला नाही. दोघेही आपापल्या धर्माचे पालन करत सुखात नांदत आहेत. गौरीसाठी शाहरुख पाच वर्षं हिंदू बनून राहिला होता, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे.

शाहरुख आणि गौरी दोघंही मुळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना गौरीने शाहरुखला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. गौरी खाननेदेखील फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 8, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या