मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पहिल्याच चित्रपटात पूनम ढिल्लोन यांनी शशी कपूर यांना मारली होती थोबाडीत; कारण...

पहिल्याच चित्रपटात पूनम ढिल्लोन यांनी शशी कपूर यांना मारली होती थोबाडीत; कारण...

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पहिल्याच चित्रपटात त्यांनी अभिनेते शशी कपूर (shashi Kapoor) यांना चक्क थोबाडीत मारली होती. पाहूया काय होता तो किस्सा...

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पहिल्याच चित्रपटात त्यांनी अभिनेते शशी कपूर (shashi Kapoor) यांना चक्क थोबाडीत मारली होती. पाहूया काय होता तो किस्सा...

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पहिल्याच चित्रपटात त्यांनी अभिनेते शशी कपूर (shashi Kapoor) यांना चक्क थोबाडीत मारली होती. पाहूया काय होता तो किस्सा...

मुंबई 18 एप्रिल: पूनम ढिल्लोन (Poonam Dhillon) या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मादक अदा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी 80चं दशक गाजवलं होतं. आज त्यांचा वाढदिवस आहे. 59व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांनी यश चोप्रा यांच्या बिग बजेट चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पहिल्याच चित्रपटात त्यांनी अभिनेते शशी कपूर (shashi Kapoor) यांना चक्क थोबाडीत मारली होती. पाहूया काय होता तो किस्सा...

1978 साली त्रिशूल या चित्रपटातून पूनम ढिल्लोन यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात शशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये पूनम यांना शशीजींना थोबाडीत मारायची होती. या सीन शूट करताना पूनम यांनी 10 टेक घेतले. पण त्यांचा अभिनय दिग्दर्शकाला आवड नव्हता. अखेर शशी कपूर यांनी खरोखरची थोबाडीत मारण्यास सांगितलं. अन् त्यांनी देखील अभिनेत्याच्या आज्ञेचं पालन करत त्यांना मारलं. हा सीन त्यावेळी खूप गाजला होता. अन् अशा प्रकारे पहिल्याच चित्रपटात शशी कपूर यांना मारुन त्यांनी आपल्या किअरची सुरुवात केली.

अवश्य पाहा -भारतातील पहिल्या स्टंटवुमन; त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार झाल्या सुपरस्टार

पूनम ढिल्लोन यांना जन्म 18 एप्रिल 1962 साली कानपुरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याकाळी स्त्रियांना फारसं शिक्षण दिलं जात नव्हतं. परंतु पूनम यांचे वडील पाश्चात्य विचारांनी प्रेरित होते. त्यामुळं त्यांनी हवं ते शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं. किंबहूना त्यांच्या प्रोत्साहनामुळंच त्यांनी अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 16 वर्षी त्यांनी मिस इंडिया या किताबावर आपलं नाव कोरलं होतं. अभिनयासोबतच त्या शिक्षणातही फार हुशार होत्या. त्यांनी डॉक्टरीचं शिक्षण घेतलं आहे. परंतु बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत असल्यामुळं त्यांनी कधीही प्रॅक्टिस केली नाही. मात्र आज बॉलिवूडमधील सर्वात सुशिक्षित कलाकारांमध्ये त्यांनी गणना केली जाते. त्यांनी ‘ये वादा राहा’, ‘नूरी’, ‘कसम’, ‘पूनम’, ‘नाम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress