मुंबई, 29 ऑगस्ट : तारक मेहता का उल्टा चश्मा ही लोकप्रिय मालिका गेल्या दशकभरापेक्षा अधिक काळ टीव्हीवर सुरू आहे. यात अंजली मेहताची भूमिका करणाऱ्या नेहा मेहताने या मालिकेला रामराम केला. Covid-19 चा धोका असल्याने नेहाने मालिका सोडली असल्याची वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. पण नुकत्याच एका मनोरंजनविषयक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नेहाने यामागचं खरं कारण अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे. "कभी कभी खामोशी बोलती है", असं नेहाने या मुलाखतीत सांगितलं.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत नेहा गेली 12 वर्षं काम करत होती. Coronavirus चा लॉकडाऊन संपल्यानंतर मालिकेचं चित्रिकरण पुन्हा सुरू झालं, तेव्हा मात्र नेहाने मालिका सोडल्याच्या बातम्या आल्या. त्यामागे कोविडचा धोका हे कारण देण्यात आलं असलं, तरी प्रत्यक्षात प्रॉडक्शन हाऊसबरोबर उडालेले खटके हे खरं कारण असल्याचं आता बोललं जात आहे.
पिंकव्हिला या वेबसाईटशी बोलताना नेहा मेहता म्हणाली, 'असित मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. माझा देवावर विश्वास आहे, म्हणून हे मी बोलते आहे... कधी कधी गप्प बसून तुम्ही खूप काही सांगू शकता. मला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे. माझ्या चाहत्यांसाठी चांगलं काम करत राहणार. शेवटी प्रत्येक गोष्टीचा अंत काहीतरी चांगल्याची सुरुवात घेऊनच येतो.'
नेहा मेहताच्या या वक्तव्यामागे प्रॉडक्शन हाउसबरोबरचे वाद असल्याचं आता सांगितलं जात आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये नेहाने प्रॉडक्शन हाऊससमो काही प्रश्न मांडले होते. पण नेहाचे मुद्दे विचारात घेतले गेले नाहीत. लॉकडाऊननंतर पुन्हा शूटिंग सुरू झालं, तेव्हाही नेहाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे वैतागून नेहाने मालिकेला अलविदा केलं, असं मनोरंजन क्षेत्रातल्या काही वेबसाईट्सनी दिलेलं वृत्त आहे.
अनुष्काप्रमाणे अनेक सौंदर्यवतींनी सोशल मीडियावर दिली गूड न्यूज! दाखवलं आपलं BABY BUMP
नेहाच्या जागी मालिकेत अंजली मेहताची भूमिका करण्यासाठी सुनैना फौजदार या अभिनेत्रीला आता करारबद्ध करण्यात आलं आहे. सुनैनाबरोबर करार करण्यापूर्वी नेहाला संपर्क साधण्यात आला होता. पण नेहाकडून प्रॉडक्शन हाऊला काहीच प्रत्युत्तर आलं नाही. म्हणून नव्या अभिनेत्रीला घेण्यात आलं, असं मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आलं.