निळाशार समुद्र आणि Bold Photos! सेलिब्रिटींना का पडतेय मालदीवची भुरळ?

निळाशार समुद्र आणि Bold Photos! सेलिब्रिटींना का पडतेय मालदीवची भुरळ?

मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मालदीवच्या समुद्र किनारी बसून सनसेट पाहण्याचा काही वेगळाच आनंद असतो.

  • Share this:

मुंबई 26 फेब्रुवारी : करोना विषाणूचं वाढतं संक्रमण, लॉकडाउन, प्रियजनांचा मृत्यू आणि सर्वत्र नैराश्येचं वातावरण यामुळे अनेक उच्चभ्रू मंडळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सध्या मालदीव येथे जात आहे. या मंडळींमध्ये प्रामुख्याने भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार मोठ्या प्रमाणावर आहेत. सोनाक्षी सिन्हा, आयुषमान खुराणा, समंथा, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, नेहा धुपिया, नुसरत भरूचा, दिशा पटनी, तारा सुतारिया, टायगर श्रॉफ, वरूण धवन, मंदिरा बेदी, तापसी पन्नू, मौनी रॉय यांसारखे अनेक नामांकित कलाकार रिफ्रेश होण्यासाठी मालदीव येथे जात आहेत.

समुद्रकिनारी मौज करणाऱ्या या कलाकारांच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियादेखील व्यापून टाकलं आहे. परंतु प्रश्न असा की या उच्चभ्रू मंडळींकडे इतके पैसे आहेत की ते जगातील कुठल्याही देशांत जाऊ शकतात मग गेल्या काही महिन्यात या सेलिब्रिटींची पसंती मालदीवलाच का आहे?

युरोप आणि अमेरिकेतील अनेक देश सध्या करोनाशी दोन हात करण्यात व्यस्त आहेत. इतर देशांतील नागरिकांमुळे करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून त्यांनी पर्यटन व्यवसाय देखील काही काळासाठी बंद ठेवला आहे. शिवाय या देशांमध्ये जायचं असेलच तर अनेक प्रकारच्या संमती घ्यावा लागतात. याउलट मालदीव येथे करोनाचा प्रसार इतर देशांच्या तुलनेत फारच कमी झाला. त्यामुळं त्यांच्या सरकारनं पर्यटनावरील निर्बंध काहीसे क्षितिल केले.

अवश्य पाहा - ‘हा सोफा गुंडाळून का आलीस?’; अर्शीचे कपडे पाहून सलमाननं उडवली खिल्ली

शिवाय भारतीयांसाठी तर मुबंई आणि दिल्ली येथून मालदीवची राजधानी मालेसाठी थेट विमान सुविधा सुरु झाली आहे. तसेच भारतीय आणि मालदीवच्या चलनामध्ये फारसा फरक नाही. मालदीवच्या एक रुपयाचं मूल्य भारताच्या पाच रुपयांइतकं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी करोनाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित असलेल्या मालदीवलाच पसंती देताना दिसत आहेत.

Published by: Mandar Gurav
First published: February 26, 2021, 1:56 PM IST

ताज्या बातम्या