Home /News /entertainment /

माधुरी दीक्षितनं का केलं नाही अभिनेत्यासोबत लग्न? सांगितलं या मागचं चकित करणारं कारण

माधुरी दीक्षितनं का केलं नाही अभिनेत्यासोबत लग्न? सांगितलं या मागचं चकित करणारं कारण

काही जणांनी तर माधुरीला थेट प्रपोज देखील केलं होतं. परंतु तरी देखील माधुरीनं कुठल्याच अभिनेत्यासोबत लग्न केलं नाही. या मागचं खरं कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

    मुंबई 30 मे: माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 90 च्या दशकांत तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ होती. केवळ तिची एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये गर्दी करत असे. लक्षवेधी बाब म्हणजे सर्वसामान्य चाहत्यांसोबतच अनेक अभिनेते देखील तिचे फॅन होते. संजय दत्त, अनिल कपूर, अजय जडेजा यांसारख्ये अनेक अभिनेते तिच्या प्रेमात होते असं म्हटलं जातं. (madhuri dixit love story) काही जणांनी तर तिला थेट प्रपोज देखील केलं होतं. परंतु तरी देखील माधुरीनं कुठल्याच अभिनेत्यासोबत लग्न केलं नाही. या मागचं खरं कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. माधुरी दिक्षीतनं का केलं नाही अभिनेत्यासोबत लग्न काही वर्षांपूर्वी माधुरीनं कॉफी विथ करण शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्येच तिनं अभिनेत्यासोबत लग्न न करण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “मी शाहरुख खान, सलमान खानसोबत खूप चित्रपट केले. आमिर खानसोबत दोनच चित्रपट केले परंतु त्यांच्यापैकी कोणाचाही मी बॉयफ्रेंड किंवा भावी पती म्हणून विचार केला नाही. कारण मला एका सर्वसामान्य व्यक्तीसोबतच लग्न करायचं होतं. माझा पतीच माझ्यासाठी खरा हिरो आहे. तो लोकांचे प्राण वाचवणारा रिअल लाईफ हिरो आहे.” माधुरीसाठी अभिमानाची गोष्ट; फोटो शेअर करत केलं मुलाचं अभिनंदन ‘बजाचं डोकं अल्ट्रा प्रोमॅक्स आहे का?’ ‘देवमाणूस’च्या नव्या व्हिडीओवर नेटकरी संतापले माधुरी कशी पडली श्रीराम नेनेंच्या प्रेमात? जिच्यावर लाखो लोक जीव टाकतात अशा माधुरीचं हृदय मात्र डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी जिंकलं. माधुरीनं स्वत: एका मुलाखतीत तिच्या प्रेमकथेविषयी सांगितलं होतं. त्यांची पहिली भेट अगदी योगायोगानं झाली होती; पण पहिल्याच भेटीत दोघांची मैत्री झाली. या दोघांची पहिली भेट लॉस एंजेलिस इथं माधुरीच्या भावाच्या पार्टीमध्ये झाली. विशेष म्हणजे तेव्हा माधुरी सुपरस्टार होती; पण डॉ. नेने यांना याची काहीच कल्पना नव्हती. माधुरी एक अभिनेत्री आहे आणि ती हिंदी चित्रपटांमध्ये काम करते, हे देखील त्यांना माहीत नव्हते. एकदा डॉ. नेने यांनी माधुरीला आपल्याबरोबर डोंगरावर बाइकवरून येण्यासंबंधी विचारलं. माधुरीनं त्याला होकार दिला. पण बाईकवरून डोंगरावर जाणं फार कठीण होतं. मात्र इथूनच माधुरी आणि श्रीराम नेने एकमेकांच्या अधिक जवळ आले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. यानंतर दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Love story, Madhuri dixit

    पुढील बातम्या