लता दीदी@90 : 'क्या करू राम मुझे बुढ्ढा मील गया...'हे गाणं गायला लता दीदी तयारच नव्हत्या

लता दीदी@90 : 'क्या करू राम मुझे बुढ्ढा मील गया...'हे गाणं गायला लता दीदी तयारच नव्हत्या

'उडत्या चालीची, द्विअर्थी गाणी गाण्याला त्यांचा ठाम विरोध होता. पण केवळ दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या अत्यंत ग्रहामुळेच क्या करू राम मुझे बुढ्ढा मील गया...' हे गाणं गायले'

  • Share this:

मुंबई, ता. 25 सप्टेंबर : गोड, कर्णमधूर, तलम, स्वर्गीय आवाज ही लता दीदींची ओळख. त्यामुळे त्यांना गानकोकीळा हे बिरूद मिळालं. लता दीदी या एकाच पद्धतीची गाणी गातात अशी त्यांच्यावर टीकाही झाली. पण त्या टीकेची त्यांनी कधीच पर्वा  केली नाही. उडत्या चालीची, द्विअर्थी गाणी गायला त्यांचा ठाम विरोध होता. पण केवळ दिग्गज अभिनेते राज कपूर यांनी केलेल्या अत्यंत आग्रहामुळेच क्या करू राम मुझे बुढ्ढा मील गया...' हे गाणं गायले असा खुलासा लता दीदींनी 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत केला होता.

'संगम' हा राज कपूरचा चित्रपट 1960 च्या दशकात चांगलाच गाजला होता. यातलं सर्वात जास्त गाणं गाजलं, ते क्या करू राम मुझे बुढ्ढा मील गया...'हे गाणं. सर्वात महत्वाचं म्हणजे लता दीदींनी हे गाणं गायलं होतं. त्यांच्या गोड आवाजातल्या त्या गाण्याची खूप चर्चा झाली.

लता दीदींनी हे गाणं गायलच कसं असे प्रश्न त्या काळात विचारले गेले. कारण दीदी अशी व्दिअर्थी गाणी कधीच गात नव्हत्या. मात्र केवळ राज कपूर यांनी आग्रहाची विनंती केल्यानेच इच्छा नसतानाही मी हे गाणं केलं अशी आठवण दीदींनी या मुलाखतीत सांगितली होती.

दीदी म्हणाल्या माझी ही गाणं गाण्याची मुळीच इच्छा नव्हती. असलं घाणेरडं गाणं मी गाणार नाही असं सांगितलही होतं.  मात्र राज कपूर यांनी विनंती केली. ते म्हणाले हा चित्रपट माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझं खूप काही या चित्रपटात पणाला लागलंय. त्यांच्या आग्रहामुळेच केवळ मी हे गाणं केलं. कारण अशी गाणी गावीत अशी माझी मनापासून इच्छा नव्हती आणि तसा माझा आवाजही नव्हता.

नंतर संगीतकारच अशी गाणी मला देत नव्हते. ते म्हणायचे लता हे गाणं गाणार नाही. त्यामुळं आपण ते गाणं दुसऱ्यांना देऊयात. आशा किंवा तर कुणी ते गाणं करतील. इच्छेच्या विरोधात गाणी गाणं हे मला कधीच जमलं नाही. त्यामुळं थोडं नुकसानही झालं. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिले.

PHOTOS : मुंबईकर 'या' सात ठिकाणी जायला घाबरतात!

First published: September 26, 2018, 7:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading