कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, आज उलगडणार रहस्य

आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट 'बाहुबली 2' आज अखेर रिलीज झाला आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2017 08:59 AM IST

कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, आज उलगडणार रहस्य

28 एप्रिल : कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आता अवघ्या काही तासात मिळणार आहे. कारण आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट 'बाहुबली 2' आज अखेर रिलीज झाला असून सध्या  थिएटर्समध्ये बाहुबली 2चा पहिला शो सुरू आहे.

'बाहुबली : द बिगिनिंग’ हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती.

'बाहुबली'चा फस्ट डे फस्ट शो पाहायला मिळावा यासाठी प्रेकक्षकांनी अक्षरश: थिएटर्स बाहेर रांगा लावत होत्या. मुंबईत प्रेक्षक मॉर्निंग वॉक सोडून सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. राज्यभरात हीच परिस्थिती आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोल्हापुरातही प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

बाहुबली आणि बल्लाळदेव यांचं आंतर्युद्ध , राजामौळीचं दिग्दर्शन, व्हिज्युअल इफेक्ट्सची मेजवानी, भव्यदिव्य सेट्स आणि मनोरंजनाची हमी घेऊन येणारा बाहुबली 2 कसा असेल याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तब्बल 4000 स्क्रिन्समध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर,  हिंदी, तेलगु , तमिळ आणि मल्याळम या चार भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे आपल्याला हव्या त्या भाषेत पाहायचं ऑप्शनही प्रेक्षकांना मिळाला आहे.

बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे बाहुबली 2 बॉक्सऑफीसवर मोठा गल्ला जमवेल हे तर स्पष्ट आहे.

Loading...

एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bahubali 2
First Published: Apr 28, 2017 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...