कंगनाचं सोशल मीडियापासुन दूर राहण्याचं 'हे' आहे कारण!

कंगनाचं सोशल मीडियापासुन दूर राहण्याचं 'हे' आहे कारण!

आजच्या सोशल मीडिआच्या युगात अनेक सेलिब्रेटी स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिआचा वापर करतात. या सेलिब्रेटींच्या लिस्ट मध्ये एक अभेनेत्री मात्र अपवाद म्हणावी लागेल ती आहे बिनधास्त कंगना रानौत.

  • Share this:

मुंबई,ता.15 एप्रिल: आजच्या सोशल मीडिआच्या युगात अनेक सेलिब्रेटी स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिआचा वापर करतात. या सेलिब्रेटींच्या लिस्ट मध्ये एक अभेनेत्री मात्र अपवाद म्हणावी लागेल ती आहे बिनधास्त कंगना रानौत.

तिला याबद्दल विचारले असता ती म्हणते सोशल मीडियावर खूप वेळ व्यर्थ खर्च होतो त्यामुळे मला सोशल मीडिया वापरायला नाही आवडत. मला माझे खूप सारे फॅन सोशल मीडिया वापरायचा सल्ला देतात पण मी मात्र त्यांना ठाम नकार देते.

माझे सहकारी मला म्हणतात की तुम्ही फक्त एक अकॉऊंट सुरु करा बाकी सर्व आम्ही करतो. पण मला ते पटत नाही कारण मी कुठलंच असं काम करत नाही ज्यामध्ये मी स्वतः ऍक्टिव्ह नसते. मला वाटते असं केल्याने मी माझ्या प्रेक्षकांना धोका देतेय.

पण कंगना जरी सोशल मीडियावर सक्रिय नसली तरीही तिची बहीण रंगोली आणि मॅनेजर मात्र नेहमी त्यांच्या सोशल मीडिया वरून कंगनाबद्दल प्रेक्षकांना अपडेट द्यायला कधीच विसरत नाहीत.

 

First published: April 15, 2018, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading