मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

डझनभर फ्लॉप सिनेमांनंतरही जॅकलिन फर्नांडिसही 'हिट', हे आहे कारण !

डझनभर फ्लॉप सिनेमांनंतरही जॅकलिन फर्नांडिसही 'हिट', हे आहे कारण !

जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) सध्या 2 फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या आगामी सिनेमांची घोषणाही झाली आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) सध्या 2 फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या आगामी सिनेमांची घोषणाही झाली आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) सध्या 2 फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या आगामी सिनेमांची घोषणाही झाली आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 28 नोव्हेंबर: श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) हातात सध्या 2 मोठे चित्रपट आहेत. 'भूत पोलीस' (Bhoot Police) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॅकलिन सध्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तसंच रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या आगामी चित्रपटामध्येही ती काम करणार आहे. या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग या आणि पुढच्या वर्षात पूर्ण होणार आहे. खरं पाहिलं तर जॅकलिनचा कोणताही चित्रपट आजपर्यंत सुपरहिट वगैरे झालेला नाही. पण तरीही तिला नवनव्या सिनेमांच्या ऑफर्स येत असतात.

11 वर्षांपूर्वी श्रीलंकेत मॉडलिंग करत असताना एका कामानिमित्त जॅकलिन भारतामध्ये आली होती. त्यावेळीच तिची भेट सुजय घोषसोबत झाली. त्याने जॅकलिनला 'अलादिन' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. फिल्म फ्लॉप ठरली पण बॉलिवूडमध्ये जॅकलिन ‘हीट’ झाली. त्यानंतर जॅकलिन 'जाने कहा से आईं है' या चित्रपटामध्ये रितेश देशमुखसोबत झळकली होती. हा सिनेमाही फ्लॉप ठरला. 2011 मध्ये 'मर्डर 2' या सिनेमामध्ये इम्रान हाश्मीसोबत झळकली होती. या सिनेमानेही फारशी कमाई केली नाही. पण जॅकलिनच्या बोल्ड अदांमुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते झाले. त्यानंतर 'हाऊसफुल्ल 2' या सिनेमामध्ये अक्षय कुमार, जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे असे सुपरस्टार्स होते. पण या फिल्ममुळेही जॅकलिनला फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर जॅकलिनच्या रेस 2, किक, रॉय या सिनेमांनीही विशेष कमाई केली नाही.

जॅकलिन फर्नांडिसच्या फ्लॉप फिल्मची यादी खूप मोठी आहे. पण तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. तसंच अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेतेही जॅकलिनसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. जॅकलीन लवकरच Attack या चित्रपटाचं शूटिंगही सुरू करणार आहे. तसंच किक 2 या सिनेमाचीही घोषणा झाली आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress