Home /News /entertainment /

स्वत:ला महिलांची कैवारी मानणारी कंगना हाथरस प्रकरणात गप्प का? शिवसेनेचा खडा सवाल

स्वत:ला महिलांची कैवारी मानणारी कंगना हाथरस प्रकरणात गप्प का? शिवसेनेचा खडा सवाल

हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करीत तिची हत्या करण्यात आली होती.

  मुंबई, 3 ऑक्टोबर : हाथरस मुद्द्यावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, कंगना काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर टीका करीत होती. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानकारक वक्तव्य केलं होतं. आता हाथरस प्रकरणात तिची बोलती बंद का झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू होते. पालिकेने कंगना रणौतचं कार्यालयातील  कथित अवैध्य बांधकाम पाडलं. दरम्यान कंगनाने महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्र सरकारला घेरलं होतं. हाथरस मुद्द्यावर कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. कंगनाने 30 सप्टेंबर रोजी लिहिलं होतं की, त्यांना योगी सरकारच्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि हाथरसमधील पीडितेला न्याय नक्की मिळेल. यादरम्यान शनिवारी शिवसेना राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं की, दिवस-रात्र मुंबई पोलिसांना दुषणे देण्यासाठी ज्यांना Y+ सुरक्षा मिळाली, जी महिलांचा आवाज होऊन मुख्यमंत्री आणि राज्याबाबत अपमानकारक वक्तव्य करीत होती, जी मीडियाची आवडती होती..तिची बोलती बंद का झाली? हाथरसच्या मुद्द्यावर त्यांनी ट्विट केलं नाही. हे ही वाचा-'सत्यमेव जयते' म्हणत रोहित पवारांनी लगावला पार्थला टोला, 'आता तोंड न लपवता...'

  कंगनाने 30 सप्टेंबर रोजी लिहिलं होतं की, त्यांना योगी सरकारच्या कर्तृत्वावर विश्वास आहे आणि हाथरसमधील पीडितेला न्याय नक्की मिळेल. यादरम्यान शनिवारी शिवसेना राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं की, दिवस-रात्र मुंबई पोलिसांना दुषणे देण्यासाठी ज्यांना Y+ सुरक्षा मिळाली, जी महिलांचा आवाज होऊन मुख्यमंत्री आणि राज्याबाबत अपमानकारक वक्तव्य करीत होती, जी मीडियाची आवडती होती..तिची बोलती बंद का झाली? हाथरसच्या मुद्द्यावर त्यांनी ट्विट केलं नाही.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Kangana ranaut, Shivsena

  पुढील बातम्या