Home /News /entertainment /

...म्हणून इरफाननं वगळलं होतं आपल्या नावातून 'खान' आडनाव

...म्हणून इरफाननं वगळलं होतं आपल्या नावातून 'खान' आडनाव

इरफाननं काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मी माझ्या नावातून 'खान' वगळलं आहे.

  मुंबई, 29 एप्रिल : समोर असलेली भूमिका कोणतीही असो. इरफाननं त्याला न्याय दिला नाही असं फार क्विचित झालं असेल. बॉलिवूडमध्ये नायकाची व्याख्या बदलत आपल्या अभिनयच्या जोरावर सिनेमा हिट करणाऱ्या या अभिनेत्यानं अखेर जगाचा निरोप घेतला. न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्यापासून अजिबात न डगमगता मृत्यूशी झुंजणाऱ्या या अभिनेत्याची लढाई अखेर संपली. मात्र प्रेक्षकांसाठी तो अनेक आठवणी मागे सोडून गेला. त्याच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. इरफानचा त्याच्या रिअल लाइफमध्येही वेगळा फंडा होता म्हणूनच कि काय त्यानं काही दिवसांपूर्वी त्याच्या नावातून खान हे आडनाव वगळलं होतं. इरफाननं काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, मी इरफान आहे फक्त इरफान. काही काळापूर्वीच मी माझ्या नावातून 'खान' वगळलं आहे. खरं सांगावं तर मी माझा धर्म किंवा आडनावामुळे किंवा अशा कोणत्याही गोष्टीसाठी लोकांनी मला ओळखावं असं मला वाटत नाही. मी माझ्या पूर्वजांच्या कामावरुन मला माझी ओळख बनवायची नाही.
  View this post on Instagram

  Yogi aur Jaya ko pyaar dene ke liye dhanyawad 🙏👍

  A post shared by Irrfan (@irrfan) on

  इरफान खानचं खरं नाव साहबजादे इरफान अली खान असं आहे. मात्र इरफाननं त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरही फक्त इरफान असंच नाव लिहिलं होतं. बॉलिवूडचा हिरो होण्यासाठी काही अलिखित मापदंड आहेत. मात्र इरफाननं हे सर्व मापदंड तोडले. नायकाची व्याख्या या अभिनेत्यानं बदलली. 'ये साली जिंदगी', 'पीकू', 'पान सिंह तोमर', 'हिंदी मीडियम' या सिनेमातील त्याचा अभिनय सर्वकाही सांगून जातो. तो एवढा धमाकेदार अभिनेता होता की एकदा एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान महेश भट्ट यांना बाबा आता जरा खराब अभिनय कर असं सांगावं लागलं होता.
  View this post on Instagram

  Puppy seems to be a better poser #QaribQaribSinglle @par_vathy @zeestudiosofficial #animallover

  A post shared by Irrfan (@irrfan) on

  इरफान मागच्या दोन वर्षांपासून न्यूरोएंडोक्राइनशी लढत होता. लंडनमध्ये उपाचार घेऊन तो मागच्या वर्षी भारतात परतला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईमध्येच उपचार सुरू होते. शनिवारी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं आणि त्यानंतर इरफानची तब्बेत खालावत गेली. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्याला आपल्या आईचं अंतिम दर्शन सुद्धा घेता आलं नव्हतं.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या