मुंबई, 1 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनय आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक जीवन, नीना गुप्ता नेहमीच आपले विचार मांडताना दिसतात. नीना गुप्ता सध्या तिचा आगामी चित्रपट 'वध'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्यांनी घटस्फोटाविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांचे घटस्फोट का होतात? याविषयी वक्तव्य केलं आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार नीना गुप्ता म्हणाल्या, 'आजच्या युगात लग्नाबाबत होत असलेल्या वादावर आपले मत मांडले. हा अत्यंत अवघड प्रश्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, आपल्याकडे याचे कोणतेही ठोस उत्तर नाही. आजकाल लोकांना असे वाटते की लग्नाची गरज नाही, परंतु त्यांच्या मते दुसरा पर्याय नाही. आजकाल स्त्रिया स्वावलंबी आहेत, म्हणूनच आज घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे,बहुतेक घटस्फोट होतात कारण अनेक तरुण मुली आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्या आपल्या पतीकडून काहीही घेत नाहीत. त्यामुळेच घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. पण अगोदर तिच्याकडे पर्याय नव्हता, ती मूकपणे सर्व काही सहन करायची. पण मला असेही वाटते की लग्न ही अनेक प्रकारे चांगली गोष्ट आहे.'
हेही वाचा - Malaika- Arjun: मलायका अरोरा प्रेग्नेंट? अर्जुन कपूर म्हणाला 'आमच्या खाजगी आयुष्याबद्दल...'
नीना गुप्ताचा 'वध' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावर्षी नीना गुप्ता 'गुडबाय' आणि 'उंचाई'मध्ये दिसल्या होत्या. या दोन्ही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी नीना गुप्तासोबत स्क्रीन शेअर केली.
दरम्यान, आपल्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच वादात असणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता नीना गुप्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या पहायला मिळतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या नेहमीच चाहत्यांसोबत संपर्क साधत असतात. नीना गुप्ता यांनी 1982 मध्ये बाॅलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News