Home /News /entertainment /

लता मंगेशकरांनी का केलं नाही लग्न? आता होणार खुलासा

लता मंगेशकरांनी का केलं नाही लग्न? आता होणार खुलासा

गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी जगाचा निरोप घेऊन आज तब्बल तीन महिने उलटले आहेत. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आणि मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अजूनही संपूर्ण देश लता दीदींच्या आठवणीत हारवून गेला आहे. आजही चाहते आणि अनेक कलाकार दीदींसोबत घालवलेले खास क्षण आठवून या महान गायिकेला आदरांजली देत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 मे-  गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी जगाचा निरोप घेऊन आज तब्बल तीन महिने उलटले आहेत. त्यांच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आणि मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अजूनही संपूर्ण देश लता दीदींच्या आठवणीत हारवून गेला आहे. आजही चाहते आणि अनेक कलाकार दीदींसोबत घालवलेले खास क्षण आठवून या महान गायिकेला आदरांजली देत आहेत. दरम्यान स्टार प्लस वाहिनी 'नाम रेह जाएगा' या खास सीरिजमधून दीदींना आदरांजली देत आहे. महान गायिका लता मंगेशकर यांच्या आठवणीत संपूर्ण संगीतक्षेत्र एकजुटीने उभा राहिला आहे. Sस्टार प्लसच्या 'नाम रह जाएगा' या विशेष सीरिजमध्ये भारतातील सर्वात लोकप्रिय 18 गायकांनी एकत्र येऊन 'नाइटिंगेल ऑफ इंडिया'ला विशेष आदरांजली वाहिली आहे.सोबतच दीदींच्या मौल्यवान आठवणींना उजाळा दिला आहे. 'नाम रेह जाएगा'च्या पुढच्या भागात, प्रेक्षकांना दिग्गज गायिकेची काही न पाहिलेली छायाचित्रे आणि सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर त्यांच्या आयुष्यातील काही दुर्मिळ आणि यापूर्वी कधीही शेअर न केलेले किस्से ऐकायला मिळतील. या एपिसोडमध्ये लताजींनी कधीही लग्न न करण्यामागचे कारण देखील उघड केलं जाणार आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना हे देखील कळेल की कुणी आपल्या राष्ट्रीय गौरव समजल्या जाणाऱ्या लता दीदींना विष द्यायचा प्रयत्न केला होता. हे सर्व 'नाम रहे जाएगा'च्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. कोणकोणते गायक होणार सहभागी- या सीरिजमध्ये प्यारेलाल जी, सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या, स्नेहा, पलक मुच्छल काही लोकप्रिय गायक दीदींना गाण्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यासोबतच या शोमध्ये काही सत्य, रंजक किस्सेही उलगडले आहेत. हा एपिसोड येत्या रविवारी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Lata Mangeshkar - लता मंगेशकर

    पुढील बातम्या