• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अशोक सराफ यांनी का नाकारले गेस्ट रोल? सांगितलं चकित करणारं कारण

अशोक सराफ यांनी का नाकारले गेस्ट रोल? सांगितलं चकित करणारं कारण

अशोक सराफ यांनी एकाही चित्रपटात का केली नाही पाहुण्या कलाकाराची भूमिका? सांगितला थक्क करणारा किस्सा

 • Share this:
  मुंबई 6 जून: अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. त्यांचे ‘बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘धुमधडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (‘Banwa Banwi’, ‘Gammat Jammat’, ‘Dhumdhadaka’, ‘Ek Daav Bhutacha’, ‘Navri Mile Navryala’) असे कित्येक चित्रपट आहेत जे आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. परंतु लक्षात घेण्याची बाब म्हणजे जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कधीही कुठल्याच चित्रपटात पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली नाही. काय होतं या मागचं खरं कारण? अशोक सराफ यांनी चांगलं मानधन मिळत असताना देखील का टाळल्या अशा भूमिका? सुनील दत्त यांनी नर्गिससाठी घेतला होता डॉनशी पंगा; मिळाली जीवे मारण्याची धमकी अगदी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून हॉलिवूड सुपरस्टार मेरील स्ट्रीपर्यंत जगभरात असे शेकडो लोकप्रिय कलाकार आहेत. जे चित्रपटांमध्ये सर्रास पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसतात. अनेकदा त्यांचे ते गेस्ट रोल देखील चित्रपटात कमाल करुन जातात. परंतु अशोक सराफ यांनी केवळ एक अपवाद वगळता असा प्रकार कधीही केला नाही. जर चित्रपटात एखादी ठोस भूमिका असेल तरच त्यांनी काम करणं पसंत केलं. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार? या तीन अभिनेत्यांची नावं चर्चेत अशोक सराफ यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत या मागचं खरं कारण सांगितलं. करिअरच्या पीकवर असताना त्यांनी बाळासाहेब सरपोद्दार यांच्या एका चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. खरं तर केवळ मैत्रीच्या नात्यानं त्यांनी एक गाणं यामध्ये केलं होतं. या चित्रपटाचा प्रीमिअर शो नागपुरमध्ये होता. शो संपल्यानंतर प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर आले अन् त्यांनी चित्रपटावर टीका करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात अशोक सराफ नाहीयेत तिकिट काढू नका असं ते इतर प्रेक्षकांना सांगत होते. नाराज झालेल्या प्रेक्षकांचा हा संवाद अशोक सराफ यांच्या कानावर पडला. अन् खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. लोकांना आपण तेच द्यायला हवं जे त्यांना हवं अन्यथा तुम्ही कितीही मोठे स्टार असला तरी तुम्हाला ते जमिनीवर आणू शकतात. याची जाणीव त्यांना झाली. त्याच क्षणी अशोक सराफ यांनी निर्णय घेतला की चित्रपटात ठोस भूमिका असेल तर काम करेन पाहुणा कलाकार साकारुन प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणार नाही.
  Published by:Mandar Gurav
  First published: