मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ऐश्वर्यामुळं बसला डायनावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का; सलमानही वाचवू शकला नाही करिअर

ऐश्वर्यामुळं बसला डायनावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का; सलमानही वाचवू शकला नाही करिअर

एक काळ होता जेव्हा डायना लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु ऐश्वर्या रायमुळं (Aishwarya Rai) तिचं करिअर संपलं असं म्हटलं जातं. अगदी सलमान खान (Salman Khan) देखील तिचं करिअर वाचवू शकला नव्हता.

एक काळ होता जेव्हा डायना लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु ऐश्वर्या रायमुळं (Aishwarya Rai) तिचं करिअर संपलं असं म्हटलं जातं. अगदी सलमान खान (Salman Khan) देखील तिचं करिअर वाचवू शकला नव्हता.

एक काळ होता जेव्हा डायना लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु ऐश्वर्या रायमुळं (Aishwarya Rai) तिचं करिअर संपलं असं म्हटलं जातं. अगदी सलमान खान (Salman Khan) देखील तिचं करिअर वाचवू शकला नव्हता.

मुंबई 1मे: डायना हेडन (Diana Hayden) ही 90 च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. मादक अदा आणि सुंदर चेहऱ्याच्या जोरावर तिनं मॉडलिंग क्षेत्रातही दबदबा निर्माण केला होता. फेमिना मिस इंडिया (Femina Miss India) जिंकून प्रकाशझोतात आलेल्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 45 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एक काळ होता जेव्हा डायना लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु ऐश्वर्या रायमुळं (Aishwarya Rai) तिचं करिअर संपलं असं म्हटलं जातं. अगदी सलमान खान (Salman Khan) देखील तिचं करिअर वाचवू शकला नव्हता.

डायनाचा जन्म 1973 साली हैद्राबादमधील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. शाळेतील स्पर्धांमध्ये भाग घेऊन ती आपली ही आवड पुर्ण करत असे. पुढे कॉलेजमध्ये शिकताना तिच्यात मॉडलिंगची आवड निर्माण झाली. अन् तिनं त्याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 1997 साली मिस इंडिया आणि फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धा जिंकून ती प्रकाशझोतात आली होती. यामुळं तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली.

तेल-शॅम्पूच्या जाहिरातीमुळं पत्रकार अनुष्का शर्मा झाली अभिनेत्री

2003 साली तेजाब या चित्रपटातून तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. परंतु तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिला अब.. बास, ऑल अलोन, लोरी यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिचा एकही चित्रपट कमाल करु शकला नाही.

त्याच काळात अभिनेत्री ऐश्वर्या राय एकामागून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत होती. तिनं देखील मिस युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळं डायनाची तुलना वारंवार ऐश्वर्याशी केली जात होती. त्याकाळी तिनं ऑडिशन दिलेल्या अनेक चित्रपटांध्ये पुढे ऐश्वर्याचीच वर्णी लागत होती. परिणामी ऐश्वर्या आणि डायनामध्ये जणू शीतयुद्धच सुरु झालं होतं. अखेर या युद्धात ऐश्वर्या जिंकली अन् डायनानं बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. पुढे 2007 साली तिनं बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. सलमान खाननं तिला बिग बॉसद्वारे रिलॉन्च केलं होतं. परंतु भाईजान देखील तिचं करिअर वाचवू शकला नाही. तिथंही तिला दिर्घ काळ टिकता आलं नाही. सध्या डायना ब्रिटनमध्ये आपल्या पतीसोबत राहात आहे.

First published:
top videos

    Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Salman khan