मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विनोदी अभिनेता का झाला खलनायक? अतुल परचुरेनं सांगितलं JD साकारण्याचं कारण

विनोदी अभिनेता का झाला खलनायक? अतुल परचुरेनं सांगितलं JD साकारण्याचं कारण

एक सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येतोय अन् तो म्हणजे अतुलनं खलनायक साकारण्यासाठी होकार का दिला?

एक सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येतोय अन् तो म्हणजे अतुलनं खलनायक साकारण्यासाठी होकार का दिला?

एक सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येतोय अन् तो म्हणजे अतुलनं खलनायक साकारण्यासाठी होकार का दिला?

मुंबई 9 जुलै: अतुल परचुरे (Atul Parchure) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘खिचडी’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘क्योकी’, ‘पार्टनर’, ‘प्रियतमा’ यांसारख्या चित्रपट आणि मालिकांद्वारे गेली तीन दशकं तो सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Atul Parchure comedy actor) लक्षवेधी बाब म्हणजे आजवरच्या करिअरमध्ये त्याने विनोदी भूमिका मोठ्या प्रमाणावर साकारल्या आहेत. परंतु यावेळी मात्र ‘माझा होशिल ना’ (Majha Hoshil Na) या मालिकेत तो एका खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. आयुष्यात पहिल्यांदाच तो एका खलनायकाची भूमिका साकारताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येतोय अन् तो म्हणजे अतुलनं खलनायक साकारण्यासाठी होकार का दिला?

‘तू किती मुर्ख आहे पुन्हा सिद्ध झालं’; लंडनमधील स्वातंत्र्यामुळे सोनम कपूर ट्रोल

महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अतुलनं खलनायक साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं. तो म्हणाला, “काही वेळेस आपण आपण फार विचार न करता एखाद्या भूमिकेला हो म्हणतो तसं काहीसं या जेडीबाबत झालं. मला आयुष्यात पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे प्रयत्न करून बघू या असा विचार केला. जेडी साकारतानाचा अनुभव फारच मनोरंजक आणि आव्हानात्मक आहे. काम आवडतंय अशा प्रतिक्रियांबरोबरच प्रेक्षकांना जेडीचा रागही येतोय. हेच त्या भूमिकेचा यश असावं. वेगवेगळ्या मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानं चेहरेपट्टी प्रेक्षकांना माहीत झालं आहे. त्यामुळे जेडी सगळ्यांपेक्षा वेगळा वाटावा यासाठी मी प्रयत्न करतोय. सूडाची भावना माझ्यात दिसणं आवश्यक होतं. तसंच महाराष्ट्र सोडून 20 वर्षं अमराठी लोकांबरोबर राहिल्यानं त्याची भाषा बिघडली असावी. या दोन गोष्टी डोक्यात ठेवून काम करतोय.”

क्रिती सेनॉन आई होणार? व्हिडीओ पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल

‘माझा होशील ना’ ही झी मराठी वाहिनीवरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गौतमी देशपांडे आणि अक्षय कुलकर्णी यांची रोमँटिक जोडी या मालिकेत प्रेक्षकांना भुरळ पाडताना दिसत आहे. त्यातच आता अतुल परचुरे जे.डी.च्या रुपात खलनायक म्हणून आलाय त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Actor, Comedy actor, Zee marathi serial